VIDEO: “आम्ही फेल झालो, ते जिंकण्यास पात्र”, आयर्लंडकडून पराभूत झाल्यानंतर अभिषेक शर्माचे मोठे वक्तव्य

शुक्रवारी (२६ जून) आयर्लंडेन भारताला पराभूत करत इतिहास रचला. बेलफास्टमध्ये झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात यजमानांनी भारताचा ३४ धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अभिशेक शर्मा बोलत होता. या सामन्यात केवळ त्यानेच भारताकडून उत्तम फलंदाजी केली, बाकीच्यांनी मात्र निराशा केला. तो पत्रकार परिषदेत म्हणाला की, आयर्लंड आमच्यापेक्षा चांगला क्रिकेट खेळला आणि ते विजयासाठी पात्र होते.

अभिषेक म्हणाला, नेहमीच असे घडते की, जेव्हा कोणतेही दोन संघ खेळायला येतात, तेव्हा जो संघ त्यावेळी चांगली कामगिरी करतो, तो आपल्या योजनांव उत्तम काम करतो. जसे की आयर्लंडने एक संघ म्हणून फलंदाजी, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली. त्यामुळे माझ्या मते, ते विजयासाठी पात्र होते.

एक संघ म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये मागे पडलो होते. तुम्ही जेव्हाही खेळता तेव्हा तुम्ही एका संघाकडून काहीतरी शिकता आणि पुढे वाटचाल करता आणि मला वाटते हा सामना त्यापैकीच एक होता. या पराभवामधून आम्ही खूप काही शिकू. ते खूप चांगले क्रिकेट खेळले आणि विजयासाठी पात्र होते, असे अभिषेकने पुढे म्हटले आहे.

पहिला सामना गमावल्याने भारतावर आता मालिका गमावण्याचा धोका आहे, तसेच आयर्लंड किमान ही मालिका हरणार नाही. डिसेंबर २०२३ नंतर प्रथमच भारत टी२० मालिका जिंकणार नाही. तसेच विश्वविजेत्या संघाला पराभूत करत आयर्लंडने इतिहास रचला. त्यांचा हा विजय भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांनमधील पहिलाच विजय ठरला.

या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत यजमान संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. त्यामध्ये त्यांनी गॅरेथ डेलानीच्या ४९ धावा आणि लोर्कन टकरच्या ५० धावांच्या जोरावर २० षटकांत ९ विकेट्स गमावत १८२ धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारत १८.५ षटकांत सर्व विकेट्स गमावत १४८ धावसंख्येवरच गारद झाला.

Comments are closed.