INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियात मोठे बदल! 'या' स्टार खेळाडूला बसणार डच्चू?

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 women’s World Cup 2026) च्या उपांत्य फेरीत (सेमीफायनल) स्थान मिळवण्यासाठी भारतीय महिला संघाला आपला शेवटचा सामना जिंकावाच लागणार आहे. टीम इंडिया हा महत्त्वाचा सामना 28 जून रोजी लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात सर्वोत्तम प्लेइंग 11 निवडण्यासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार (Amol Majumdar) संघात बदल करण्याच्या विचारात आहेत. आतापर्यंत टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्सवर विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय अनिवार्य आहे. यासाठी संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल करण्याची शक्यता आहे.

गेल्या सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या नंदिनी शर्माला (Nandini Sharma) संघातून वगळून त्यांच्या जागी क्रांती गौडला (kranti Gaud) संधी दिली जाऊ शकते. सर्वांचे लक्ष सलामीच्या फलंदाज शेफाली वर्मा आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांच्या कामगिरीवर असेल; जर या दोघींनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजी केली, तर भारताच्या विजयाच्या आशा उंचावतील. तसेच, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टीरक्षक ऋचा घोष यांचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड अतिशय उत्तम आहे, त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याव्यतिरिक्त दीप्ती शर्मालाही आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड.

Comments are closed.