Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर
Maharashtra Live Breaking News Updates: उद्धव ठाकरे यांच्या दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरे आज परभणी आणि धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजता परभणी येथे उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे. परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडल्याने या सभेला मोठं महत्त्व प्राप्त झाले आहे. यानंतर दुपारी 3.30 वाजता धाराशिव येथे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. धाराशिव हा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मतदारसंघ आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकरांवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय..
Comments are closed.