उद्धव ठाकरेंनी सांगितलं, मला विमानात मुख्यमंत्री हतबल दिसले; आता देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिय
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला परवा विमानात भेटले. त्यावेळी मुख्यमंत्री हतबल दिसत होते. एवढा हतबल मुख्यमंत्री मी त्यादिवशी पाहिला, त्यांना कळत होतं पंख आपलेचं बॉस कापताय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं काय झालं ते सुद्धा भाजप अध्यक्ष होते. पण नंतर काय इथेनॉल पाणी टाकलं आणि त्यांचे पंख छाटले. आता नितीन गडकरी कुठेय?, असा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे आज परभणीच्या दौऱ्यावर आहेत. फुटीर खासदार संजय जाधव यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी संजय जाधव यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)
ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) पंख छाटण्याचं काम सुरु असल्याचं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री मला जेव्हा विमानात भेटले, तेव्हा ते हतबल दिसले, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यावर देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. मला कुठले पंखच नाही, तर कोण माझे पंख कोण छाटणार?, असा प्रतिसवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. माझेसोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे. माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आम्ही एकमेकांच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या : देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर
उद्धव ठाकरेंसोबतच्या एका विमानातील प्रवाशावीरल प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, माझ्याकरता राजकीय प्रश्न गौण आहे. राजकीय प्रश्नांनी कुणाचंही भलं होणार नाही. सगळे प्रश्न विकासाने सुटणार आहेत. सर्व्हिस फ्लाईटमध्ये जर आम्ही योगायोगाने एकत्र बसलो तर त्यावर एवढ्या चर्चा का करायच्या?, असं वाटलं, आपण वेड्यांच्या बाजारात बसलोय का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे एका बाजूला बसले होते आणि मी दुसऱ्या बाजूला पण आम्ही शेजारी-शेजाारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या अजून काय…अशी मिश्किल प्रतिक्रियाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. माझी सवय आहे की, मी विमानात बसल्यावर मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेली वेबसिरीज पाहात होतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हाणाले. (देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर)
संबंधित बातमी:
उद्धव ठाकरे UNCUT PC : विश्वास ठेवा, हेच मी बेईमानीबद्दल म्हणतोय… शिवसेनेशी बेईमानी कोणी केली.
Comments are closed.