अमरावतीत समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील 5 जणांचा मृत्यू
अमरावती: राज्यातील अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसून येत नाहीत, गेल्या आठवडाभरात विविध जिल्ह्यात झालेल्या अपघातात अनेक नागरिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याचं दिसून आलं. आता, अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अपघाताची (Accident) भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला.
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. थेट नागपूर ते मुंबई सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी म्हणून देशभरात नावारुपाला आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात अपघातात महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारमधील मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर येथील रहिवासी असून मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ
Comments are closed.