TET पेपर फुटीप्रकरणी आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयात काय झाला युक्तिवाद?
ठाणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी (Police) दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
राज्य शिक्षक पात्रता म्हणजेच टीईटी पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धीरज बलराज सिंग (२८, हरियाणा), राजीव साव (४५, बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (३०, बिहार) यांना रविवारी भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान आरोपींकडून टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. तसेच या प्रकरणामागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय असून दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. पेपर नेमका कुठून आला, महाराष्ट्रात आणखी कुठे विक्री करण्यात आली का, आर्थिक व्यवहार कोणकोणाशी झाले आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून 6 जुलैपर्यंत आरोपींना पीसीआर देण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी धीरज सिंगच्या वकिलांनी त्याच्यावर यापूर्वी बॅरिएट्रिक (आतड्याशी संबंधित) शस्त्रक्रिया झाल्याने नियमित औषधोपचाराची गरज असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर पोलिसांनी आवश्यक वैद्यकीय उपचार दिले जात असल्याचे स्पष्ट केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आता या तपासात फरार आरोपींचा शोध, आर्थिक व्यवहार आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करण्यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
युवक काँग्रेसचं दादा भुसेंच्या बंगल्यासमोर आंदोलन
राज्यातील TET पेपरफुटी विरोधात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर युवक काँग्रेसने आज आंदोलन करत शासनाच्या कारभाचा निषेध नोंदवला. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी फडकावले दादा भुसे राजीनामा द्या असे पोस्टर झळकावत आपला रोष व्यक्त केला. मंत्रालय आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आले. दादा भुसे यांच्या बंगल्यासमोर ‘पेपरचोर गद्दीछोड’च्या घोषणा लिहिल्या आहेत. यावेळी, झीनत शबरीन यांच्यासह कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा
पोलिसांना सीन रीक्रिएशन करुन दाखवलं; लोहगडावरुन खाली उतरताना सिया थांबली, तोंडावरील मास्क काढला अन्…
केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च : केतन अग्रवाल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कँडल मार्च
Comments are closed.