नागपुरात FDA ची मोठी कारवाई, तब्बल 20 लाखांहून अधिक किंमतीचा विनापरवाना साठवलेला औषधसाठा जप्त

नागपूर क्राईम न्यूज : नागपुरातील न्यू एरा हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर एफडीएनं मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना साठवलेला 20 लाखांहून अधिक किंमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. एफडीएने रुग्णालयाच्या बेसमेंटमधून औषधांचा साठा जप्त केला आहे. संबंधित जागेसाठी वैध औषध विक्री परवाना नसल्याचा आरोप केला आहे. औषधांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे सादर करण्यात अपयश आल्यानं ही कारवाई केली आहे. औषधांचे दोन नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.

प्रिस्क्रिप्शनची प्रत रुग्ण किंवा नातेवाईकांना न दिल्याने प्रकरण निदर्शनास आले

रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. प्रिस्क्रिप्शनची प्रत रुग्ण किंवा नातेवाईकांना न दिल्याचे निदर्शनास आले आहे. संगणकीय इंडेंटद्वारे थेट फार्मसीकडे औषध मागवण्याची पद्धत उघड झाली आहे. रुग्णांना बाहेरुन औषधे घेण्याची मुभा या एफडीएच्या आदेशाचे उल्लंघन केलं आहे. रुग्णांना निवडीचा अधिकार असल्याचा फलकही रुग्णालयात आढळला नाही. तपासणीत औषध विक्री नियमांचे अनेक उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. केमिस्ट अँड ड्रगिस्टचा नामफलक नसल्याचे आढळले आहे.  मुदतबाह्य औषधांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याचा ठपका, Schedule H-1 औषधांच्या साठा आणि नोंदीत तफावत आढळली आहे. तपासणी पुस्तक (फॉर्म-35) उपलब्ध नसल्याचे निदर्शनास, रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कारवाई प्रस्तावित आहे. विशिष्ट मेडिकलमधून औषधे घेण्यास सक्ती झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tukaram Mundhe: आयुक्त तुकाराम मुंढेंचे भेसळखोरांविरोधात कडक पावले

दबंग अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त (FDA Commissioner) पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्यातील भेसळखोरी विरोधात कडक पावले उचलली आहेत. मंदिरांच्या परिसरात खाजगी दुकानदार प्रसादाच्या नावाखाली भाविकांना अतिशय निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री करत असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. भाविकांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या अशा घटकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. तसेच दुधामध्ये होणाऱ्या भेसळीच्या विरोधात देखील मुंढे यांनी कठोर पावले उचलली आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण आणि धडक कारवाईमुळे शिर्डी परिसरातील भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. भाविकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईच्या माध्यमातून देण्यात आला आहे. आगामी काळातही हे धाडसत्र अधिक तीव्र केले जाईल, असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.

Comments are closed.