दृश्य मनोरंजन; लोखंडी गेटवरून खाली उतरताच सिया थांबली, तिच्या चेहऱ्यावरून मुखवटा काढून टाकला आणि.

केतन अग्रवाल पुणे लोहगड प्रकरण: लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal ) आरोपी सिया गोयलला (Siya Goyal) लोहगडावर आणून चौकशी करण्यात आली. केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील लोहगडावर पोलिसांनी आज सकाळी 9 वाजता क्राईम सीनचं रिक्रिएशन केलं. केतन अग्रवालची हत्या कशी झाली याचा सीन रिक्रिएट करण्यात आलं.

सीन रिक्रिएटनसाठी आरोपी सियाला आज लोहगडावर आणण्यात आले होते. सियाला लोहगडावर नेऊन पोलिसांनी केतनला दरीत कसं ढकललं, याचं सीन रिक्रिएट केला. दरम्यान, लोहगडावरील सियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सिया मास्क घालून आल्याचं दिसून येत आहे. सीन रिक्रिएट करुन झाल्यानंतर लोहगडावरुन खाली उतरताना सियाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे सियाने तोंडावरील मास्क काढले आणि थोडावेळ एकाच जागी थांबून मोठ्याने श्वास घेऊ लागली. यानंतर पुन्हा चेहऱ्यावर मास्क घालून सिया गोयल लोहगडावरुन खाली उतरली. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटाही उपस्थित होता. (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

सियाची पोलीस चौकशीत धक्कादायक कबुली- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आला आहे. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची काल (27 जून) चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत सियाने धक्कादायक कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटले, असं सियाने चौकशीत म्हटलं आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न मोडल्यास कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातील, अशी सियाची भावना होती. त्यामुळे लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने चौकशीत सांगितल्याची पोलीस सूत्रांची माहिती आहे.  (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

सियाच्या आई-वडिलांनी पोलीस चौकशीत सगळं सांगितलं, मुलीला तोंडावर पाडलं- (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

पोलीस चौकशीत सियाने मला केतनसोबत लग्न करायचं नाही, हे कुटुंबीयांना सांगितल्याचं म्हटलं होतं. परंतु सियाच्या आई-वडिलांनी तिला तोंडावर पाडणारा जबाब पोलिसांना दिला आहे. केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, असं सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांनी चौकशीत म्हटलं आहे. तसेच याआधी सियाच्या भावाचीही चौकशी करण्यात आली होती. यावेळी सियाच्या भावानेही केतनशी लग्न करायचं नाही, हे सियानं कुणालाही सांगितलं नव्हतं, अशी माहिती पोलिसांना दिली होती. (Ketan Agrawal Pune Lohagadh Case)

केतनच्या हत्येचं रिक्रियेशन ‘कसं’ झालं? (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

– सिया आणि चेतनला घेऊन पुणे ग्रामीण पोलीस सकाळी 6:30 वाजता पोहचले. सोबत केतनच्या वजनाचा पुतळा आणण्यात आला.
– 18 जूनला लोहगडावर 75 मिनिटांत काय घडलं? हे प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी, केतन ऐवजी त्याच्या वजनाचा पुतळा घेऊन रिक्रियेशनला सुरुवात झाली.
– हत्येदिवशी लोहगडाच्या पायथ्याला 9 वाजून 20 मिनिटांनी केतनने आलिशान वाहन आणि मागून आलेल्या चेतनने दुचाकी कुठं पार्क केली.
– तिकीट काढताना हावभावातून एकमेकांना काय सांगितलं? सीसीटीव्हीतील त्या प्रसंगात काय-काय घडलं?
– हत्येदिवशी लोहगडावर 10 वाजून 5 मिनिटांनी पोहचला, मग पुढची 15 ते 20 मिनिटं कुठं-कुठं ट्रेक केला. त्यावेळी चेतनने कसा पाठलाग केला.
– 10 वाजून 25 मिनिटाला घटनास्थळी कसे पोहचले. मग केतन आणि सियामध्ये काय-काय घडलं. तेंव्हा चेतन कुठं दबा धरुन बसला होता?
– 10 वाजून 35 मिनिटाला केतनला सिया आणि चेतनने कसं ढकललं? हे जाणून घेण्यासाठी पुतळ्याला या दोघांना हत्येदिवशी जसं ढकलून दिलं, अगदी तसंच ढकलून द्यायला लावलं.
– सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेले मनोरंजन तीन तासांत पूर्ण झाले.

सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन करुन दाखवलं, VIDEO:

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Pune Lohagad Case: केतनला दरीत कसं ढकललं?; सिया आणि चेतनने लोहगडावर सीन रीक्रिएशन करुन दाखवलं, पहिले फोटो समोर

Ketan Agrawal Pune Lohagad Case: लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलची धक्कादायक कबुली, पोलीस चौकशीत काय काय म्हणाली?

Comments are closed.