‘वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार…’; परभणीत उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांना कडाडून सुनावलं; ‘बाब

संजय जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे : परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासह राज्यातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पाऊल उचलले असून, ते प्रत्येक बंडखोर खासदाराच्या मतदारसंघात जाऊन जाहीर मेळावे घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज परभणीत शिवसेना निष्ठावंतांचा मोठा मेळावा पार पडला. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सभेची सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “येथे खुर्च्यांवर जे लोक बसले आहेत ते भाड्याने आणलेले नाहीत, तर ते हक्काचे माणसे आहेत. तुझा माज उतरवण्यासाठी एक शब्द पुरेसा आहे… बोलून बोलून किती बोलणार?”

संजय जाधवांवर उद्धव ठाकरे : बंदखोर खासदार संजय जाधवर जोरदार प्रहार

खासदार संजय जाधव यांच्यावर तोफ डागताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जेव्हा मी शेतकऱ्यांसाठी दौरा काढला होता, तेव्हा आमदार राहुल पाटील माझ्यासोबत होते. हा गद्दार मात्र दौऱ्याला नव्हता, कुठेच हा गद्दार दिसला नाही. आता म्हणतो की उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही. हो, माझी चूक झाली! लक्ष दिलं असतं तर तुझ्या भानगडी आधीच कळल्या असत्या.”

ते पुढे म्हणाले, “मी येथे विधानसभेसाठी प्रचाराला आलो होतो आणि लोकसभेला सुद्धा आलो होतो. लोकसभेला तो स्टेडियम पूर्ण भरला होता. राहुल पाटील आपल्याला त्याच स्टेडियममध्ये पुन्हा एक सभा घ्यायची आहे. त्याच स्टेडियमवर जिथे त्या गद्दारासाठी सभा घेतली होती. वाघाचं कातडं पांगरलेला हा एक होता. मी दोघांचे हात वरती केले. त्यातला एक हात राहुलने जो पकडला होता तो वरच्या वर अजूनही अभिमानाने आहे आणि दुसरा पळाला. हे विकास करण्यासाठी पळाले,” असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

Uddhav Thackeray: 6 खासदारांच्या पात्रतेवरून लोकसभा अध्यक्षांना इशारा

पक्षांतर केलेल्या 6 खासदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी संविधानाचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, खासदार फुटत असताना आम्ही लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन आमचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती केली होती. “जर देशात कायद्याचे राज्य असेल तर हे 6 खासदार बाद झालेच पाहिजेत. जर तुम्ही कायदा पाळला नाही, तर लोकसभा अध्यक्ष इतरांना कायदा पाळायला सांगू शकणार नाहीत. आम्ही अधिकार मानतो, कोणाची मर्जी मानणार नाही. कायद्याचे रक्षण करणारे लोकसभा अध्यक्ष आहेत, असा माझा समज आहे. घटनेचे उल्लंघन होऊ देऊ नका, नाहीतर इतिहास तुम्हाला ‘घटना मोडणारे लोकसभा अध्यक्ष’ म्हणून नोंदवेल,” असा इशारा त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे भाजपवर : 'बाबर जनता पार्टी' म्हंटल भाजप

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राम मंदिरासाठी शिवसेनेने मदत केली, चांदीची वीट दिली. आता कळत आहे की ‘मंदिर वही बनायेंगे’ हे कशासाठी होतं? तुम्हाला मंदिर बांधायचं नव्हतं, तुम्हाला रामाच्या नावाने लुटालूट करण्याचं दुकान उघडायचं होतं. हिंदू हा बिचारा असाच भोळा आहे, त्याला ‘जय श्रीराम’ म्हटलं की तो विसरून जातो. ही गद्दारी फक्त आपल्याशी झालेली नाही, ही गद्दारी हिंदुत्वाशी झालेली आहे, देशातील नव्हे तर जगातील हिंदूंशी केलेली ही गद्दारी आहे. जशी आता कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाली आहे, तशी नवीन बीजेपी जन्माला आलेली आहे. ही नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं मंदिर बाबराने पाडलं होतं, आता आपण राम मंदिर उभारलं. आता राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आली आहे ती म्हणजे बाबर जनता पार्टी. ही बाबरांची औलाद आहे. त्या बाबराने ते मंदिर पाडलं होतं, ही बाबराची औलाद आता हे राम मंदिर लुटत आहे, मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक काय? मग तुम्ही बाबर जनता पार्टीचे आहात का?,” असे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आणखी वाचा

Chandrakant Patil on Vishwas Nangre Patil: विश्वास नांगरे पाटलांनी संघाची शाखा जॉईन करावी; चंद्रकांत पाटलांची खुली ऑफर, म्हणाले, ‘आरएसएस काय देशद्रोही संघटना नाही’

Comments are closed.