सोशल मीडियावर झाली ओळख, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तरुणीसोबत नको-नको ते क

नाशिक क्राईम न्यूज : सोशल मीडियावर ओळख करून प्रेमसंबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष दाखवून एका 18 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik) समोर आला आहे. संशयिताने पीडितेचे लैंगिक शोषण करून नंतर तिच्या जातीवरून छळ करत लग्नास नकार दिल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News: स्नॅपचॅटवरील ओळख ठरली घातक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील पिंपळगाव खांब (वडनेर रोड) भागात राहणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थिनीची ‘स्नॅपचॅट’ (Snapchat App) या सोशल मीडिया ॲपद्वारे संशयित स्वरूप अमोल संधान (रा. सह्याद्रीनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत संशयिताने तरुणीशी जवळीक साधली, प्रेमसंबंध निर्माण केले आणि तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले.

Nashik Crime News: 6 महिने लैंगिक शोषण आणि जातीवाचक शिवीगाळ

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, डिसेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीत संशयित आरोपी स्वरूप संधान याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, पीडित तरुणीने जेव्हा संशयिताकडे लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने तिच्या जातीचा उल्लेख करून तिला हीन वागणूक दिली आणि लग्न करण्यास साफ नकार दिला.

Nashik Crime News: संशयित आरोपी अद्याप फरार

आपली फसवणूक आणि मानसिक तसेच शारीरिक छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेच्या कालावधीत पीडितेचे वय विचारात घेऊन पोलिसांनी या प्रकरणात पोक्सो कायद्याची कलमेही जोडली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने करत आहेत. संशयित आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

केतन अग्रवाल पुणे लोहगड प्रकरण: पोलिस दृश्य मनोरंजन; लोखंडी गेटवरून खाली उतरताच सिया थांबली, तिच्या चेहऱ्यावरून मुखवटा काढून टाकला आणि.

Ketan Agrawal Pune Lohagad Case: लग्न मोडण्यापेक्षा केतनला संपवणं सोपं वाटलं; सिया गोयलची धक्कादायक कबुली, पोलीस चौकशीत काय काय म्हणाली?

Comments are closed.