BCCIचा मोठा निर्णय! फक्त कसोटी होणार, टी-20 ला नो एन्ट्री… ‘या’ देशाच्या क्रिकेट बोर्डाचा प्र
भारताचा श्रीलंका दौरा: क्रिकेट विश्वातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक असा कडक निर्णय घेतला आहे. एका शेजारील देशाच्या क्रिकेट बोर्डाने टीम इंडियासोबत टी-20 मालिका खेळण्यासाठी अत्यंत आशेने पाठवलेला प्रस्ताव बीसीसीआयने थेट धुडकावून लावला आहे. त्यामुळे आता या आगामी दौऱ्यात फक्त कसोटी सामने होणार असून, टी-20 क्रिकेटला ‘नो एन्ट्री’ देण्यात आली आहे.
खरंतर, ऑगस्ट 2026 मध्ये होणारा भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा आता फक्त दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपुरताच मर्यादित राहणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (SLC) या दौऱ्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका समाविष्ट करण्याची विनंती केली होती, जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फेटाळली आहे. भारताच्या अत्यंत व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. दोन्ही देशांमधील ही कसोटी मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी केली होती विनंती
या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दित्वह (Ditwah) चक्रीवादळग्रस्तांच्या मदतनिधीसाठी आर्थिक साहाय्य उभारण्याच्या उद्देशाने 3 अतिरिक्त टी-20 सामने खेळण्याची विनंती बीसीसीआयकडे केली होती. श्रीलंका आणि भारत यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आणि भारताच्या पुढील दौऱ्यापूर्वी दोन आठवड्यांचा वेळ उपलब्ध होता. या काळात या टी-20 सामन्यांचे आयोजन करता येऊ शकले असते, यावर दोन्ही बोर्डांमध्ये चर्चाही झाली. मात्र, खेळाडूंचे कार्यमान व्यवस्थापन (Workload Management) आणि आधीच ठरलेल्या इतर क्रिकेट मालिकांमुळे बीसीसीआयने या प्रस्तावास असमर्थता दर्शवली.
BCCI चे स्पष्टीकरण आणि भारताचे पुढील व्यस्त वेळापत्रक
‘स्पोर्टस्टार’च्या वृत्तानुसार, बीसीसीआयने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला स्पष्ट केले आहे की, सध्याच्या व्यस्त वेळापत्रकात अतिरिक्त सामने खेळवणे अशक्य आहे. मात्र, भविष्यात जेव्हा कधी भारतीय संघाच्या वेळापत्रकात सवड मिळेल, तेव्हा अशा प्रकारच्या मदतफेरीच्या सामन्यांसाठी भारत नक्कीच तयार असेल, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.
श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत गजबजलेले आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारत बांगलादेशविरुद्ध 3 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जाईल, जिथे 3 कसोटी, 5 वन-डे आणि 5 टी-20 सामने खेळवले जातील.
वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार असून दोन्ही देशांमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हाय-व्होल्टेज कसोटी मालिका रंगणार आहे. या सर्व महत्त्वाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर, खेळाडूंना दुखापतींपासून वाचवण्यासाठी आणि विश्रांती देण्यासाठी श्रीलंकाविरुद्धची टी-20 मालिका रद्द करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेचे संभाव्य वेळापत्रक :
15 ते 19 ऑगस्ट – पहिली कसोटी – गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, गॉल
23 ते 27 ऑगस्ट – दुसरी कसोटी – सिंहलीज स्पोर्ट्स क्लब (SSC) ग्राउंड, कोलंबो
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.