एकनाथ शिंदे राम, तर देवेंद्र फडणवीस लक्ष्मण; ज्योती वाघमारेंकडून उद्धव ठाकरेंना रावणाची उपमा, स
ज्योती वाघमारे: शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी एकनाथ शिंदे (मराठी) यांना चक्क प्रभू मिस्टररामाची उपमा दिली आहे. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्मणाची उपमा देत राज्यामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं खासदार ज्योती वाघमारे यांनी सुतोवाच केला आहे. सहा खासदार शिवसेनेत आल्यानंतर राज्यात मोठा पक्ष कोणता? अशी चर्चा सुरू झाली. या अनुषंगाने खासदार ज्योती वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्मणाची उपमा देत शिवसेना मोठा पक्ष असल्याचं सुचवलं आहे. सेना-भाजपामध्ये मोठ्या पक्षावरून सुरू असलेला सुप्त वाद ज्योती वाघमारे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आता भाजप या वक्तव्याला काय प्रत्युत्तर देत, हे पहावं लागेल.
दरम्यान, ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना रावणाची तर संजय राऊत (Sanjay Raut) यांना कैकयीची उपमा दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यात एका कार्यक्रमाला आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ज्योती वाघमारे यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.
Jyoti Waghmare : उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार
उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे वराती मागून घोडं नाचवण्याचा प्रकार आहे. सहा खासदारांची वरात निघून गेली, आता हे घोड आणि शिंगरू चौकशा करत राज्यभर फिरत आहेत. त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याची टीका शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरती केला आहे. हेच तुम्ही योग्य वेळेवरती केला असता तर त्याचा उपयोग झाला असता. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे कल्पवृक्ष होते. त्यांची मुलं ही त्यावरील बांडगुळ आहेत. उद्धव ठाकरे हे त्याच बांडगुळासारखे आहेत का हा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी स्वतःला विचारावा आणि संजय राऊत रोज शिवीगाळ करणारा तो गांडूळ आहे. गांडुळाचा उपयोग हा शेतीमाती सुपीक करायला होत असला तरी संजय राऊत यांचा उपयोग मात्र ठाकरे गट नापीक करायचं काम करतोय, असा हल्लाबोल खासदार ज्योती वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
Beed News : उद्धव ठाकरे यांचे जेसीबीतून फुलांची उधळण करत स्वागत; समर्थकांनी केली मोठी गर्दी
परळीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आले.यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं स्वागत केले. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण केली आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांबरोबरच परळीकरांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आले. यावेळी परळीतल्या नागरिकांकडून ज्योतिर्लिंग वैजनाथाची प्रेम देखील उद्धव ठाकरे यांना देण्यात आली आहे आणि या फ्रेम वर आपला माथा ठेवत त्यांनी नमस्कार केलाय.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.