संजय राऊत माथेफिरू, माझं अख्ख आयुष्य वारकरी संप्रदायात गेलंय; बंडू जाधवांचा पलटवार

संजय राऊत यांच्यावर संजय जाधव: विमानातील व्हायरल व्हिडिओवर नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. यावरुन त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पागल संजय राऊत, व्हिडिओमध्ये दारु होते म्हणाले. माझं आख्खं आयुष्य वारकरी संप्रदायात गेलं आहे. हे बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. हे मला बदनाम करत नाहीत, पक्षप्रमुखाला बदनाम करत आहेत. शिवसेना संपवण्याचे काम कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केल्याचे टीका संजय जाधव यांनी केली.

उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली

पक्ष संपवण्याचे काम या महाभागाने केलं आहे. मला वाटत की उद्धव साहेबांची शिवसेना संपवण्याची सुपारी त्यांनी  घेतली असावी. आम्ही सहा जण का गेलो? मला रोज 25 कॉल असे येतात की आमच्याकडे सभागृह नाही रस्ता नाही, म्हणून? परभणीची 400 कोटीची डीपीडीसी होती माझ्या फंडात 3 कोटी होते, मग समाधान करायचं कसं? सगळ्या गोष्टी आमच्या समोर भेडसावत होत्या. निवडणुका आल्या उमेदवारी पाहिजे त्याच्यासोबत नगदी द्या? कुठून नगदी द्या? आमचा पक्ष तर असा होता, काही द्यायचा घ्यायचा संबंधच नव्हता असे संजय जाधव म्हणाले.

Comments are closed.