धाराशिवमध्ये 500 कोटींचे प्लॉट खरेदी, ओमराजेच्या मागे ईडी लागली; सोंगाड्या म्हणत राऊत कडाडले
ओमराजे निंबाळकरांवर संजय राऊत : धाराशिवमध्ये आयोजित केलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात खासदार संजय राऊत (संजय राऊत)यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर (ओमराज निंबाळकर)यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरु झाले आहे आणि ते सक्सेस झालं आहे. गद्दार, भामटा आणि सोंगाड्या असे म्हणत अगदी शेलक्या शब्दात राऊतांनी ओमराजेंचा समाचार घेतला आहे. तसेच ओमरादजे निंभालकरांनी शिवसेना का सोडली? याबाबत देखील संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.
ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला
हा भामटा का गेला? हे सांगताना संजय राऊत म्हणाले की, त्याने प्रचंड भ्रष्टाचार केल्याची टीका ओमराजे निंबाळकरांवर केली. आता मला असेही वाटत आहे की, त्याच्या वडिलांचा जो खून झाला आहे, त्या खुनामागे देखील वेगळं काहीतरी रहस्य आहे असे संजय राऊत म्हणाले. हा गेला कारण पनराजे मल्टिस्टेट या त्याच्या कंपनीने 500 कोटींचे प्लॉट आख्ख्या धाराशिवमध्ये खरेदी केले. त्याची ईडीकडून चौकशी लागली म्हणून तो शिंदे गटात गेला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. हा घाबरुन शिंदे गटात गेला आहे. वडिलांच्या नावाने स्थापने केलेल्या गरिबांच्या नावाने बनावट खाती उघडून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला आहे. तेरणातील भंगार विकून त्याने पैसा खाल्ला असे अनेक गुन्हे केले म्हणू या सगळ्यांची चौकशी लागली. म्हणून हा डरपोक सोंगाड्या पक्ष सोडून गेल्याचे राऊत म्हणाले. आण्ही 15, 20 वर्ष एका सापाला दूध पाडले होते. पण आता त्याचा फणा ठेचायची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले.
धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरु झाले
धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरु झाले आहे आणि ते सक्सेस झालं आहे. कैलास पाटील यांनी सांगितलं आहे, शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडणार नाही, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा निष्ठावंत आमदार उद्धव साहेबाला मिळाला असल्याचे संजय राऊत म्हणाले. हा गद्दार भामटा आणि सोंगाड्या आहे. याने भामटेगिरी केली आहे. हा भाषणामध्ये सांगायचा की, 2006 साली मी ग्रामपंचायतीचा सदस्य देखील नव्हतो. मला उद्धवसाहेबांनी साथ दिली. त्यामुळं मी एक वेळा आमदार झालो दोन वेळा खासदार झालो. उद्धवसाहेबांना कधी सोडणार नाही म्हणाला मग आता काय केलं? भामट्या गद्दारा 100 कोटीला विकला गेला अशी टीका राऊतांनी ओमराजेंवर केली.
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा
Comments are closed.