वैभव सूर्यवंशी करणार पदार्पण? आयर्लंडमध्ये सामन्यावर पावसाचे सावट, भारतावर मालिका गमावण्याचे सं
India vs Ireland 2nd T20 Live Cricket Scorecard Update In Marathi : आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात मिळालेल्या धक्कादायक पराभवानंतर आता भारतीय संघावर मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. दोन सामन्यांच्या या टी-20 मालिकेत आयर्लंडने पहिल्याच सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव करत मोठा उलटफेर केला. आता विश्वविजेत्या टीम इंडियाला आपली पत राखण्यासाठी आणि मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे.
भारतासमोर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान
पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ सध्या मालिकेत 0-1 ने मागे आहे. जर दुसरा सामना भारताने जिंकला, तरच ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटू शकते. अन्यथा, आयरलँडसारख्या संघाविरुद्ध मालिका गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवू शकते. यात भर म्हणून की काय, या दुसऱ्या सामन्यावर पावसाचे मोठे सावट आहे. जर पावसामुळे सामना धुवून निघाला, तर भारताला मालिकेवर पाणी सोडावे लागेल आणि आयरलँड ऐतिहासिक मालिका विजय साजरा करेल.
वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाची उत्सुकता
या महत्त्वाच्या सामन्यात सर्वांच्या नजरा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याच्यावर खिळल्या आहेत. चाहते त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पहिल्या सामन्यातील भारतीय संघाची कामगिरी पाहता प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित मानला जात आहे.
Comments are closed.