…म्हणून वैभव बेंचवरच बसून होता, हिंदुस्थानच्या प्रशिक्षकांनी इंग्लंड दौऱ्यापूर्वी केले स्पष्ट
वैभव सूर्यवंशीचे आयर्लंड टी-20 मालिकेत पदार्पण अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. वैभवला संधी न दिल्यामुळे वाद निर्माण झाला. जगभरातील माजी क्रिकेटपटू आणि चाहते त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक होते, पण तसे आयर्लंडमध्ये घडले नाही. या नवीन संघात खेळाडूंना अधिक संधी मिळावी, आत्मविश्वास वाढावा, दीर्घकाळ खेळता यावे हे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या वैभव अन्य खेळाडूंप्रमाणे याच प्रक्रियेतून जात आहे. त्यालाही काही काळ वाट पाहावी लागणार आहे. म्हणूनच आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत वैभव बेंचवरच होता, असे हिंदुस्थानचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डॉशेट यांनी स्पष्ट केले. त्याच्या क्षमतेबद्दल कोणताही प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले.
संजूमुळेच वैभव बाहेर
हिंदुस्थानने या फॉर्मात असलेल्या फलंदाजाला संधी दिली नाही. याबाबत रायन यांनी सांगितले की, ‘‘संजू सॅमसनला संघातून वगळणे हा सोपा निर्णय नव्हता. कारण त्याने गेल्या टी-20 विश्वचषकात हिंदुस्थानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे यात शंका नाही, पण कोणाच्या जागी त्याला संधी द्यायची, हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
Comments are closed.