बेन स्टोक्सने जाता-जाता इंग्लंडच्या पुढील कसोटी कर्णधाराचे नाव केले उघड! म्हणाला, “त्यामुळेच तो…”

न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसापूर्वीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. हा सामना इंग्लंडने १६० धावांनी गमावला आणि मालिकाही २-१ ने गमावली. स्टोक्सच्या निवृत्तीनंतर इंग्लंडचा पुढील कसोटी कर्णधार कोण? याचे उत्तर त्यानेच दिले आहे.

स्टोक्सच्या अनुपस्थितीत जो रुटने या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात नेतृत्व केले होते. मात्र, स्टोक्सने निवृत्तीनंतर हॅरी ब्रुकला पाठिंबा दिला आहे, जो सध्या इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांचा कर्णधार आणि कसोटीचा उपकर्णधार आहे. दुसऱ्या कसोटीत रुटने कर्णधारपद भुषवले असले तरी स्टोक्सने त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ब्रुक हा कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार आहे.

स्टोक्सने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले, “आम्ही ब्रुकला या संघाचा उपकर्णधार होण्यास सांगितले, त्यामागे एक कारण आहे. मी जो रुटच्या नेतृत्वाखाली बराच काळ उपकर्णधार होतो. त्यामुळे कर्णधार ही एक स्वाभाविकपणे पुढची पायरी आहे. मग हॅरीला पुढील कर्णधार होण्यास का सांगू नये. तो एक जबरदस्त खेळाडू आहे. सध्याच्या संघात तो वरिष्ठ खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या खांद्यावर अधिक जबाबदारी आल्यास तो कदाचित आणखी चांगला खेळाडू बनेल.”

“जर मला विचारले की कर्णधारपद कोणी सांभाळाले पाहिजे, तर मी हॅरी ब्रुकला माझा १०० टक्के पाठिंबा देईन”, असे न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या आणि जवळपास १५ वर्षे इंग्लंडकडून खेळलेल्या स्टोक्सने पुढे म्हटले आहे.

माजी कर्णधार मायकल वॉ यांनी ब्रुक आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांची जोडी कसोटीसाठी अस्थिर ठरु शकते, असे वक्तव्य केले होते. ते म्हणाले, “मी इंग्लिश क्रिकेटमधील खेळाडूंच्या या गटाकडे पाहतो आणि मला वाटते की त्यांच्यात खूप प्रतिक्षा आहे. मी केवळ ऍंडी फ्लॉवरकडे पाहते आणि जे जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक आहेत. जर ते संघाचे मुख्य प्रशिक्षक असते तर ब्रुक कर्णधार होऊ शकला असता. मात्र, मी कसोटीमध्ये ब्रुक आणि मॅक्युलम यांना एकत्र खेळवु शकत नाही.”

स्टोक्सच्या निवृत्तीनंतर बॅझबॉलचाही शेवट झाला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. ज्या ‘बॅझबॉल’ची सुरुवात २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झाली आणि २०२६ मध्ये न्यूझीलंडनेच त्याचा शेवट केला.

Comments are closed.