मोठी बातमी : IPLचं मैदान गाजवणारा खेळाडू वादाच्या भोवऱ्यात; जेवण बनवणाऱ्यालाच चोपलं, 3 कलमांखाल

क्रिकेटपटू शशांक सिंगवर एफआयआर दाखल : भारतीय क्रिकेट जगतातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. आयपीएलमध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून चमकलेला अष्टपैलू खेळाडू शशांक सिंग त्याचे वडील आणि माजी आयपीएस अधिकारी शैलेश सिंग, तसेच त्यांच्या ड्रायव्हरविरुद्ध भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात काम करणाऱ्याला मारहाण, शिवीगाळ आणि जबरदस्तीने डांबून ठेवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? (Why Shashank Singh against FIR Filed)

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रातीबाड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीवा येथील रहिवासी असलेल्या विपेंद्र सिंग तोमर (वय 31) याने ही तक्रार दिली आहे. विपेंद्रने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत भोपाळला आणण्यात आले होते. माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या नीलबाड येथील बंगल्यावर दरमहा 15,000 रुपये पगार, राहणे-खाणे मोफत आणि भविष्यात सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन त्याला देण्यात आले होते.

फोन जप्त करून डांबून ठेवल्याचा आरोप

विपेंद्रने आरोप केला आहे की, कामावर रुजू झाल्यानंतर काही तासांतच त्याच्यावर मानसिक दबाव आणला गेला आणि त्याला शिवीगाळ करण्यात आली. जेवणाच्या दर्जावरून (Quality) झालेल्या वादामुळे प्रकरण अधिकच चिघळले. घरातील अपमानास्पद वातावरण पाहून जेव्हा विपेंद्रने नोकरी सोडण्याची आणि आपल्या गावी परतण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा शशांक सिंग आणि त्याचे कुटुंबीय संतप्त झाले. विपेंद्रने कोणाशीही संपर्क साधू नये म्हणून त्याचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेण्यात आला आणि त्याच्या इच्छेविरुद्ध काम करण्यासाठी दबाव टाकण्यात आला.

दरवाजा तोडून बेदम मारहाण

स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विपेंद्रने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. मात्र, शशांक सिंग, त्याचे वडील आणि चालकाने मिळून खोलीचा दरवाजा जबरदस्तीने उघडला आणि त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर मारहाणीच्या जखमांचे स्पष्ट निशाण आढळून आले आहेत.

या कलमांखाली गुन्हा दाखल

वैद्यकीय अहवाल आणि पीडिताच्या तक्रारीच्या आधारे रातीबाड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS)कलमांनुसार एफआयआर (FIR) नोंदवला आहे. ज्यामध्ये कलम 296 (ब) सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य आणि शिवीगाळ करणे. कलम 115 (2) स्वेच्छेने दुखापत करणे किंवा हल्ला करणे. कलम 3 (5) समान हेतूने अनेक व्यक्तींनी मिळून केलेला गुन्हा (संयुक्त गुन्हेगारी दायित्व). या गंभीर आरोपांनंतर आणि एफआयआर दाखल झाल्यानंतरही क्रिकेटर शशांक सिंग किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

हे ही वाचा –

Asian Games 2026 Women Team India Squad : विश्वचषकातून बाहेर, आता सुवर्ण पदकासाठी लढाई! एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा जाहीर, संघातून एका मोठ्या नावाचा पत्ता कट, पाहा संपूर्ण Squad

Comments are closed.