बाकीचे खेळाडू भारतातच, पण शुभमन गिल अन् KL राहुल अचानक इंग्लंडला रवाना, त्यात हुकमी एक्का दौऱ्य
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका: भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित 3 सामन्यांची वनडे (ODI) मालिका येत्या 14 जुलैपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना बर्मिंगहॅमच्या ऐतिहासिक एजबेस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय गोटातून दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल हे दोघेही उर्वरित संघाच्या आधीच बर्मिंगहॅममध्ये दाखल होणार आहेत.
गिल आणि राहुल अर्ध्यावर पोहोचतील? (शुबमन गिल KL राहुल IND vs ENG ODI मालिका)
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ वेगवेगळ्या ग्रुपमध्ये रवाना होणार आहे. कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल हे दोघेही 1 ते 11 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेचा भाग नाहीत. त्यामुळे भारतात रिकामे बसून राहण्यापेक्षा, त्यांनी आधीच इंग्लंडला पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. बर्मिंगहॅममधील हवामान आणि तिथल्या खेळपट्ट्यांचा अंदाज घेत स्वतःला वातावरणाशी जुळवून घेणे आणि वनडे मालिकेसाठी जोरदार सराव करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. वनडे संघातील उर्वरित खेळाडू 12 जुलैपर्यंत बर्मिंगहॅममध्ये एकत्र येतील.
🚨 नितीश कुमार रेड्डी वर अपडेट 🚨
– नितीश कुमार रेड्डी इंग्लंड एकदिवसीय सामन्यांसाठी वेळेच्या विरोधात धाव घेत आहेत, झिम्बाब्वे टी-20 मध्ये पुनरागमन करण्याकडे लक्ष आहे. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/8eYUFoA0KE
– जॉन्स. (@CricCrazyJohns) 30 जून 2026
नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीचे अपडेट; खेळण्यावर प्रश्नचिन्ह (Nitish Kumar Reddy India VS England ODI Series)
एकीकडे वरिष्ठ खेळाडू तयारीला लागले असताना, दुसरीकडे भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा मांडीला झालेल्या दुखापतीमुळे या वनडे मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने त्याला सध्या पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असून, तो अजून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियाही सुरू करू शकलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी तो तंदुरुस्त होणे अशक्य असून, त्याची थेट झिम्बाब्वे दौऱ्यातच पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
इंग्लंड वनडे मालिकेसाठी भारतीय संघ (Indian Squad for ODI series vs England) : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.