‘गौरवने विश्वास तोडला, मुलीला खलनायक बनवले’,आकांक्षा चमोलाच्या वडिलांचा जावयावर संतप्त टिका – Tezzbuzz

गौरव खन्ना हा एक टेलिव्हिजन लोकप्रिय अभिनेता आहे, त्याने बिग बॉस 19 मध्ये सहभाग घेतला होता आणि तो त्या सीझनचा विजेता ही झाला होता तर सध्या तो त्याच्या वैयक्तिक एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. गौरव खन्नाच्या पत्नी आणि अभिनेत्री आकांक्षा चमोलाने ‘लॉकअप २’ या रिॲलिटी शोच्या सेटवर खुलासा केला की, आम्ही जवळपास 1 वर्षापासुन वेगळे राहत आहोत. आणि आता त्यांचा घटस्फोट होत आहे. तर या बातमीने आता चाहत्याना चांगलाच धक्का बसला आहे. कारण काही दिवसांपासुन त्याचे प्रेमळ फोटो, व्हिडिओ येत होते मात्र आता हे आता हि बातमी ऐकताच सर्वाना धक्काच बसला आहे.

तर या प्रंसगावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काहि जण अभिनेत्रीच्या या खुलाशाला पीआर स्टंट म्हणत आहेत, तर काही जण तिच्यावर आणि गौरववर चाहत्यांच्या भावनांशी खेळण्याचा आरोप करत आहेत. याच दरम्यान, आकांक्षाचे वडील असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने आकांक्षा आणि गौरवच्या नात्याबद्दल धक्कादायक दावे केले आहेत. गौरव खन्ना आणि आकांक्षा यांच्याबद्दलच्या एका इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना, त्या व्यक्तीने लिहिले, “तुम्ही अगदी खरं सांगत आहात, म्हणून सांगतो की मी आकांक्षाचा वडील आहे आणि तिने जे काही सांगितले ते पूर्णपणे खरे आहे. आकांक्षा गेल्या वर्षापासुन आमच्याकडे राहत आहे. तिचे म्हणने होते की जोपर्यत आधिकृत तोपर्यत आम्ही एकमेकांना सपोर्ट करु..

तसेच त्याने पुढे लिहले आहे कि, अभिमानने (gaurav) मुलाबद्दल न बोलण्याचे वचन दिले होते, पण त्याने तो विश्वास मोडला. सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने हे मुद्दाम केले. त्याने पूर्ण नियोजनाने आकांक्षाला माध्यमांमध्ये खलनायिका म्हणून मुद्दाम चित्रित केले. धन्यवाद.” मात्र कमेंटमध्ये आकांक्षाचे  वडील आहेत की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा

“माझ्यात मातृत्वाची भावना नाही…” ‘लॉकअप २’ मध्ये आकांक्षा चमोलाने सांगितले घटस्फोटाचे कारण

Comments are closed.