ENG vs IND टी 20 मालिकेचे थेट प्रक्षेपण दोन वेगवेगळ्या नेटवर्कमार्फत! सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिका खेळल्या जाणार असून त्याची सुरूवात टी२० मालिकेने होणार आहे. यामधील पहिला सामना १ जुलैला खेळला जाणार आहे. नुकतेच भारताने आयर्लंड दौऱ्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळताना टी२० मालिका ०-२ अशी गमावली. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत चांगली सुरूवात करण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी या टी२० मालिकेचे वेळापत्रक आणि त्याचे थेट प्रक्षेपण कुठे केले जाईल, याबाबत जाणून घेऊ.
आयर्लंड विरुद्ध भारत टी२० मालिका सोनी लिव्ह ऍप आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर त्याचे थेट प्रक्षेपण झाले, मात्र इंग्लंड विरुद्ध भारत टी२० मालिका दोन वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर थेट उपलब्ध असणार आहे. यापैकी एक सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आहे, तर दुसरे जिओहॉटस्टार आहे. तुम्ही मालिकेच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर तर लाईव्ह स्ट्रीमिंग, ऑनलाईन स्ट्रीमिंग किंवा स्मार्ट टीव्हीवर सामने पाहण्यासाठी तुम्हाला जिओहॉटस्टार वेबसाईट किंवा ऍपचा वापर करावा लागेल.
इंग्लंड विरुद्ध भारत टी२० मालिकेचे वेळापत्रक पाहिले तर पहिला सामना १ जुलैला चेस्टर ले स्ट्रीट मैदानावर, दुसरा सामना ४ जुलैला मॅंचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे, तिसरा सामना ७ जुलैला नॉटिंगहममधील ट्रेंट ब्रिज येथे, चौथा सामना ९ जुलैला ब्रिस्टल काउंटी ग्राउंडवर आणि पाचवा सामना ११ जुलैला साउथम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. यामधील तीन सामन्यांची वेळ सारखी असून उर्वरित दोन सामन्यांची वेळ वेगळी आहे.
टी २० मालिकेतील पहिला, तिसरा आणि चौथा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता सुरू होणार आहे. तसेच दुसरा आणि पाचवा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रसारित होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत टी२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना – १ जुलै, चेस्टर ले स्ट्रीट मैदान (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता)
दुसरा सामना – ४ जुलै, मॅंचेस्टर (भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
तिसरा सामना – ७ जुलै, नॉटिंगहम, ट्रेंट ब्रिज (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता)
चौथा सामना – ९ जुलै, ब्रिस्टल, काउंटी ग्राउंड (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता)
पाचवा सामना – ११ जुलै, साउथॅम्प्टन (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
इंग्लंड दौऱ्यातील टी २० मालिकेसाठी टीम इंडिया –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यांश शेडगे, वैभव सूर्यवंशी, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.
इंग्लंडचा संघ – हॅरी ब्रूक (उजवीकडे), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर (विकेटकीपर), जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स (विकेटकीप), सॅम कुरन, लियाम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, जोश वुडग, लूक वुडग.
Comments are closed.