टीम इंडियाला हरवण्यासाठी इंग्लंडचा मास्टरप्लॅन; मॅचच्या 24 तास आधीच जाहीर केली खतरनाक प्लेइंग-1
इंग्लंड विरुद्ध भारत 1ली T20I प्लेइंग इलेव्हन घोषित : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बुधवारी डर्हम येथील रिव्हरसाइड मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी यजमान इंग्लंड संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीत खेळलेल्या जोफ्रा आर्चर आणि जोश टंग या प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली असून, कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली एक अनुभवी संघ मैदानात उतरणार आहे.
अनुभवी खेळाडूंचा भरणा
इंग्लंडने पहिल्या सामन्यासाठी निवडलेल्या संघात आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंचा समावेश केला आहे. संघाच्या फलंदाजीची धुरा फिल साल्ट आणि जोस बटलर या स्फोटक जोडीवर असेल, जे डावाची सुरुवात करतील. तर स्वतः कर्णधार हॅरी ब्रूक तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. मध्य फळीत तरुण अष्टपैलू जॅकोब बेथेल आणि टॉम बँटन संघाला बळकटी देतील.
🚨 भारत विरुद्ध डरहम येथे उद्या होणाऱ्या पहिल्या T20 सामन्यासाठी इंग्लंडने त्यांच्या एकादशाची निवड केली आहे.
काल न्यूझीलंडविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीत खेळलेल्या जोफ्रा आर्चर आणि जोश टँग या दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे.#ENGvIND pic.twitter.com/i6bSbk4ZaQ
— Cricbuzz (@cricbuzz) 30 जून 2026
अष्टपैलू आणि गोलंदाजीचे पर्याय
संघाकडे सॅम करन, विल जॅक्स आणि लियाम डॉसन यांच्या रूपाने तगडे अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहेत, जे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही आघाड्यांवर खोली प्रदान करतात. गोलंदाजीचे नेतृत्व साकिब महमूद आणि ल्यूक वूड हे वेगवान गोलंदाज करतील, तर फिरकीची धुरा अनुभवी लेग-स्पिनर आदिल रशीद याच्या खांद्यावर असेल.
भारताविरुद्ध पहिला टी-20 सामन्यात इंग्लंडची प्लेइंग-11 (England Playing XI) : फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रूक (कर्ंधर), जेकब बेथेल, टॉम बंटन, सॅम कुरान, विल जॅक, लियाम डॉसन, साकिब महमूद, आदिल रशीद, ल्यूक वुड.
इंग्लंडने बुधवारी रात्री डरहममध्ये भारताविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यासाठी त्यांची XI जाहीर केली आहे 🏴🚨#ENGvIND pic.twitter.com/PYntn8h7sb
— इंग्लंडची बार्मी आर्मी 🏴🎺 (@TheBarmyArmy) 30 जून 2026
IND vs ENG टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
भारत आणि इंग्लंड यांच्यात 1 जुलै ते 19 जुलै दरम्यान पाच टी-20 आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय संघ नुकताच आयर्लंडविरुद्ध बेलफास्ट येथे झालेली मालिका 2-0 ने गमावून या दौऱ्यावर आला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर दबाव असेल. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर मायदेशी परतला असून त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे.
- 1 जुलै 2026 : पहिला टी-20 सामना, रात्री 10:00 वाजता
- 4 जुलै 2026 : दुसरा टी-20 सामना, संध्याकाळी 7:00 वाजता
- 7 जुलै 2026 : तिसरा टी-20 सामना, रात्री 10:00 वाजता
- 9 जुलै 2026 : चौथा टी-20 सामना, रात्री 10:00 वाजता
- 11 जुलै 2026 : पाचवा टी-20 सामना, संध्याकाळी 7:00 वाजता
सामना कधी, कुठे अन् किती वाजता होणार? (India Vs England Live Streaming Details)
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला टी-20 सामना 1 जुलै बुधवार रोजी चेस्टर-ले-स्ट्रीटच्या रिव्हरसाइड ग्राउंडवर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10:00 वाजता सुरू होईल, तर सामन्याचा टॉस (फेक) रात्री 9:30 वाजता होईल. या सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण ‘सोनी स्पोर्ट्स नेटवर्क’वर (Sony Sports Network) उपलब्ध असेल. तसेच ‘डीडी नॅशनल’वर (DD National) हा सामना मोफत पाहता येईल. डिजिटल प्रेक्षकांसाठी या सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्हवर नसून जिओहॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर केले जाईल.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Comments are closed.