हार्दिक पंड्याने मुंबई सोडली; करिअरला सर्वोच्च स्थानी ठेवत घेतला मोठा निर्णय
हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण त्याची चर्चा ही त्याच्या कामगिरीवरून नव्हे तर तंदुरुस्तीवरुन सुरू आहे. सततच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने हार्दिक पंड्याने थेट मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पुन्हा एकदा झळाळी देण्यासाठी त्याने मुंबई सोडून बंगळुरूमध्ये स्थायीक होण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकने आपले ट्रेनिंग बेस कायमचे मुंबईहून बंगळुरू येथील बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ मध्ये शिफ्ट केले आहे. राष्ट्रीय संघ, आयपीएल किंवा घरगुती क्रिकेटचे सामने नसतील, तेव्हा हार्दिक बंगळुरूमध्येच राहून सराव करेल. हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे राष्ट्रीय अकादमीजवळ घर घेऊन तिथेच स्थायी सराव करणारा तो पहिलाच मोठा सक्रिय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हार्दिक मुंबईत राहत होता आणि मुंबई इंडियन्सच्या हाय-परफॉर्मन्स सेंटरमध्ये सराव करत होता. मात्र, प्रवासाचा त्रास वाचवण्यासाठी आणि एकाच ठिकाणी जागतिक दर्जाच्या वैद्यकीय, रिकव्हरी व फिटनेस सुविधा मिळवण्यासाठी त्याने COE च्या जवळच एक घर भाड्याने घेतले आहे. पुढील 5 ते 6 वर्षे हिंदुस्थानसाठी मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळण्याचे त्याचे लक्ष्य आहे. या विशेष ट्रेनिंग दरम्यान बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकासोबतच हार्दिकचे वैयक्तिक फिजियो आणि ट्रेनर देखील त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवणार आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
झिम्बाब्वेचा वादळी तडाखा; बांगलादेशच्या नांग्या ठेचत कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय केला साजरा
हार्दिक सध्या मांडीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे हिंदुस्थान संघाच्या युके (UK) दौऱ्यातून बाहेर आहे. सध्या तो या दुखापतीतून सावरत असून लवकरच बंगळुरूमध्ये आपली रिकव्हरी सुरू करेल. युके दौऱ्यानंतर होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील त्याच्या पुनरागमनबाबत अद्याप निश्चितता नाही. बीसीसीआयच्या ‘रिटर्न-टू-प्ले’ प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय पथकाने पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केल्यानंतरच त्याची संघात निवड केली जाईल.
Comments are closed.