आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट…; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा

मराठी on Uddhav Thackeray: विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. महायुतीकडून उपसभापती पदाचा अर्ज भरल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी सचिन अहिर यांचे पक्षात जाहीर स्वागत केले. यावेळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट’ अशी म्हण वापरत अत्यंत बोचरा वार केला आहे. तसेच “मी जे काही करतो, ते फुलप्रूफ करतो” असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आज सचिन तेंडुलकर,,,,, सचिन अहिर त्यांनी पण आज षटकार मारले आहे. ग्रासरूटचा कार्यकर्ता म्हणून सचिन अहिर यांच्याकडे पहिले जाते, त्यांनी आज महायुतीतून उपसभापती पदाचा फॉर्म भरला आहे, उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल. फक्त मुंबई नाही तर महाराष्ट्राचे उपसभापती म्हणून ते काम करतील, ते आल्यामुळे शिवसेनेची ताकद मुंबई कामगार क्षेत्रात वाढेल. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री असताना देखील कार्यकर्ता म्हणून काम केले,” असे त्यांनी म्हटले.

मराठी: आम्ही तोडायला नाही, जोडायला आलोय

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “एक टीम म्हणून काम करण्यात त्यांचा हातखंडा आहे, मी त्यांचे मनापासून स्वागत करतो, शुभेच्छा देतो. 2022 ला उठाव झाला, आज 30 तारीख आहे तेव्हा देखील याच तारखेला माझा शपथविधी झाला होता, हा योगायोग आहे, मी देवेंद्रजी एकत्र होतो, दोघांनी टीम म्हणून काम केले. महाविकास आघाडीच्या वेळी विकासकामात थोडा बॅकलॉग होता. पण, महायुतीच्या काळात महाराष्ट्र सर्व क्षेत्रात धावू लागला. मागच्या आठवड्यात सहा खासदारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला, खासदार 20 लाखांमधून निवडून येतो, आपल्या नेत्याने आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजे ही मापक अपेक्षा असते. आज गोकुळ गीते देखील सोबत आहेत, आम्ही तोडायला नाही जोडायला आलो आहे, पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणे ही आमची भूमिका आहे.”

मराठी on Uddhav Thackeray: आपला ते बाळा, दुसरयाचं ते गाडी.

“लोकप्रतिनिधींना विकास पाहिजे, लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघातील लोकांना न्याय देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी ते येत आहेत. लोक गेले की त्यावर काही लोक काय-काय बोलतात हे आपल्याला माहिती आहे, असेपर्यंत चांगला आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट हे असं सुरू आहे. आता देखील काही लोक काय-काय बोलत आहेत, मी त्यावर बोलू इच्छित नाही. परंतु मी आपल्याला एवढेच सांगेन की, आम्ही ज्या पद्धतीने पुढे जात आहोत, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवण्याचा निर्धार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर “एकनाथ शिंदे करतो ते फुलप्रूफ करतो त्यामुळे काही अडचण नाही. मी काही खुलासा करणार नाही पण जे काही केले ते फुलप्रूफ आहे,” असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

आणखी वाचा

मराठी Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर…एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

Comments are closed.