कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! बांगलादेशवर एक डाव आणि 85 धावांनी मात; मुझरबानीसह गोलंदाज चमकले
झिम्बाब्वे संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा अपसेट घडवला आहे. कसोटी सामन्यात झिम्ब्बाब्वेने बांगलादेशचा तब्बल १ डाव व ८५ धावांनी पराभव केला आहे. झिम्बाब्वेसाठी हा विजय विशेष महत्त्वाचा आहे, कारण बांगलादेश ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’ (WTC) २०२५-२७ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. झिम्बाब्वे संघासाठी त्यांच्या कसोटी इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा विजय आहे.
झिम्बाब्वेने हरारेमध्ये झालेल्या या कसोटी सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करत असलेल्या बांगलादेशला १४० धावांत सर्वबाद केलं. त्यानंतर प्रत्युत्तरात पहिल्या डावात संघाने ४१० धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात बांगलादेशला १८५ धावांत गुंडाळलं. २५ वर्षांहून अधिक कालावधीनंतर झिम्बाब्वेने सलग दोन कसोटी सामने जिंकले आहेत. यापूर्वी, त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये अफगाणिस्तानचा एका डावाने आणि ७३ धावांनी पराभव केला होता.
बांगलादेशविरुद्धच्या विजयासह त्यांनी आता सलग दुसरा कसोटी विजय मिळवला आहे. यापूर्वी त्यांनी एप्रिल २००१ मध्ये अशी कामगिरी केली होती आणि योगायोगाने, तेव्हाही त्यांनी बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची मालिका निर्भेळ विजयासह (क्लीन स्वीप) जिंकली होती. एकंदरीत, झिम्बाब्वेने सलग दोन कसोटी सामने जिंकण्याची ही केवळ तिसरीच वेळ आहे; याआधी १९९८ मध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तानचा सलग सामन्यांमध्ये पराभव केला होता.
झिम्बाब्वेकडून सलामीवीर इनोसेंट किया याने १४० धावांची खेळी केली. याशिवाय बेन करतने ४२ धावा तर ब्रायन बेनेटने ५९ आणि क्रेग एरिवीने याने ६० धावांचं योगदान दिलं. तर खालच्या फळीत वेसली मधेवेरेने ७७ धावांची खेळी केली आणि संघाला ४१० धावांपर्यंत पोहोचवलं. यानंतर झिम्बाब्वेच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यूमन न्यामहूरीने पहिल्या डावात चार बळी घेतले, तर ब्लेसिंग मुझाराबानीने दुसऱ्या डावात चार बळी घेतले.
बांगलादेशकडून मोमिनुल हक हा एकमेव फलंदाज असा होता ज्याने दोन्ही डावांत मिळून अर्धशतक (६० धावा) झळकावलं. नऊ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. पहिल्या डावात बांगलादेश १४० धावांवर सर्वबाद झाल्यानंतर झिम्बाब्वेने फॉलोऑन दिला. पहिल्या डावात दुसऱ्या डावात ३४ धावांसह मुशफिकुर रहीम सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर रिचर्ड न्गारावाच्या नेतृत्वाखालील झिम्बाब्वेचा हा पहिलाच सामना होता.
मात्र, या पराभवामुळे बांगलादेशला गुणतालिकेत कोणताही फटका बसणार नाही; कारण झिम्बाब्वे WTC चा भाग नाही आणि त्यामुळे WTC च्या क्रमवारीवर कोणताही परिणाम होणार नाही.
Comments are closed.