सचिन तेंडुलकर…एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VI
सचिन अहिर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश कालपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेले आणि आदित्य ठाकरेंसोबत (Aditya Thackeray) सावलीसारखे वावरणारे सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. आज सकाळपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी कुणाला संधी मिळणार याची चर्चा होती. मात्र, आज अचानक शिवसेनेकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याची दृश्य समोर आली.
विधानपरिषेतील उपसभापती पदासाठी अर्ज भरल्यानंतर एकनाथ शिंदे (मराठी) यांनी सचिन अहिर (Sachin Ahir) यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सचिन अहिर यांनी आपली भूमिका जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे सुरूवातीला चुकून सचिन अहिरांना आमदार सचिन तेंडुलकर म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या या उच्चारानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. एकनाथ शिंदेंसोबत सचिन अहिरांसह पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले. सचिन अहिर यांनी आज षटकार मारला. गेल्या आठवड्यात सहा खासदारांनी षटकार मारला होता. अजूनही चौकार षटकार सुरूच आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. मगाशी मी चुकून सचिन तेंडुलकर असं नाव घेतलं. परंतु सचिन अहिर देखील उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. आज त्यांनी गुगली देखील टाकली, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले? (Aditya Thackeray On Sachin Ahir)
सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची?, जवळचे आणि ज्यांना सगळं काही मिळतं तेच निघून जातात. कुणाच्या जाण्याने धक्का बसत नाही. वरळी, शिवडी हा आमचा बालेकिल्ला आहे.आमचं तिकडचं काम बोलेल. तुम्हाला अजून काय हवंय, आणखी काय ओरबाडाणार?, सगळ्या परिवाराला काही ना काही दिलंय, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली. तसेच वरळीतून ते (सचिन अहिर) उमेदवार असतील तर काही फरक पडणार नाही, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. सचिन अहिरांना हाच प्रश्न आहे की, जे सोडून गेले, जे मंदिरं लुटतायत त्यांच्यासोबत तुम्ही कसे जाऊ शकता? आम्हाला खोलवर अभ्यास केल्यावर हे लक्षात आलंय की, हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
शिंदे गटात सामील होताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना पाठवले पत्र- (सचिन अहिर उद्धव ठाकरेंना पत्र)
शिंदे गटात जाताच सचिन अहिर यांनी माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणत एक पत्र धाडलं. यामध्ये सचिन अहिर यांनी शिवसेना ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा (Sachin Ahir has resigned from all posts within the Shivsena UBT) दिला आहे. सरचिटणीस भारतीय कामगार सेनेच्या तसेच अध्यक्ष बृहन्मुंबई बेस्ट कामगार सेना या पदांवर कार्यरत आहे. आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि उपरोक्त पदांवर काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले व पक्षाचे मनःपूर्वक आभारी आहे. तथापि, मी काही अपरिहार्य कारणास्तव मी भारतीय कामगार सेनेचा व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पदांचा राजीनामा देत आहे. तरी महोदय आपण माझा हा राजीनामा मंजूर करण्यात यावा, तसचे आपण दाखविलेला विश्वास व प्रेम कायम असेच राहवे, ही नम्र विनंती. पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा सदैव राहतील, असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. (Sachin Ahir Shivsena)
कोण आहेत सचिन अहिर? (Who Is Sachin Ahir?)
- सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधानपरिषदेचे आमदार
- विधानसभा निवडणुकीत तीन वेळा,विधानपरिषदेवर एकदा विजयी
- वरळीमधून 1999, 2004 ,2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी
- 2009 ला गृहनिर्माण राज्यमंत्रिपदी
- 26 जुलै 2019 ला राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल
- 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी
- 2022 मध्ये विधानपरिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती
- 30 जून 2026 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत
- 30 जून विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भरला अर्ज
संबंधित बातमी:
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.