केळीच्या ट्रकमधून गांजांची तस्करी! 2 कोटी 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, भंडाऱ्यात मोठी कारवाई

भंडारा क्राईम न्यूज : मुंबईच्या नार्कोटिक्स विभागानं आज भंडाऱ्यात गांजा तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 2.5 कोटींच्या गांजासह 30 लाखांचा ट्रॅक असा 2.35 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ओडिशातून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या केळीच्या आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी केली जात होती. अखेर या गांजा तस्करांवर मुंबईच्या नार्कोटिक्स विभागानं मोठी कारवाई केली आहे.

केळीच्या कॅरेटमध्ये लपवून एका आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी

केळीच्या कॅरेटमध्ये लपवून एका आयशर ट्रकमधून गांजाची तस्करी होत होती. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या ट्रकवर नार्कोटिक्स विभागानं भंडाऱ्यात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. ओडिशा येथून मुंबईच्या दिशेने या आयशर ट्रक मधील कॅरेटमध्ये लपवून सुमारे 245 किलो गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाला मिळाली होती. या माहितीवरुन या विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या या आयशर ट्रकचा पाठलाग केला.

सेंदूरवाफा येथील टोल नाक्यावर या आयशर ट्रकला सापळा रचून थांबवण्यात आलं

भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील सेंदूरवाफा येथील टोल नाक्यावर या आयशर ट्रकला सापळा रचून थांबवण्यात आलं. ट्रकची झडती घेतली असता कॅरेटमध्ये लपवून गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 2.5 कोटींचा 245 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईत ट्रक चालक कमलेश बघेल (42 ) नागपूर आणि क्लिनर प्रशांत दुर्बे (22) अमरावती या दोघांना अटक केली असून ज्या आयशर ट्रकमधून ही वाहतूक करण्यात येत होती तोही आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत गांजा आणि आयशर ट्रक असा 2.35 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाच्या पथकानं भंडाऱ्यात ही कारवाई केल्यानं पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये अलिशान कारमधुन गुटखा वाहतुक करणा-याविरुध्द अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई केली आहे.  आरोपीकडून 28,88,330/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव याने प्रतिबंधित आणि शरिरास अपायकारक होईल असा गुटखा आणि सुगंधीत तंबाखु विक्री करणे करीता खरेदी केलेला असून तो त्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने अमोल जाधवच्या राहत्या घराजवळ जावुन खात्री केली. तेथे तीन जण पांढरे रंगाचे कारमधून काही गोण्या स्विप्ट कारमध्ये भरतांना दिसले. तेव्हा पथकाने सदर ठिकाणी छापा टाकुन तिघांना ताब्यात घेतले आहे.

Comments are closed.