एकनाथ शिंदेंची प्रकृती कशी? ताप अन् अशक्तपणा असल्याने रुग्णालयात दाखल, मोठी माहिती समोर
मराठी Health Update : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीबद्दल (मराठी Health) महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी अशक्तपणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांची तब्येत स्थिर असून संध्याकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सततची दगदग, धावपळ यामुळे एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा आला होता आणि त्यांची तब्येत बिघडल्याचं सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून जुपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत असल्याने ठाण्याच्या जुपिटर रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून संध्याकाळी त्यांना डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती आहे.
मराठी News : सततची दगदग अन् धावपळ
ऑपरेशन टायगर आणि त्यानंतर झालेल्या सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांची प्रचंड धावपळ झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर लगेच राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांना विश्रांतीसाठी वेळ मिळाला नसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला. परिणामी, शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे यांचा ताप आणि अशक्तपणा वाढला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं..
मराठी Health News : एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर
एकनाथ शिंदे यांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणतीही काळजी करण्याचं कारण नसल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शनिवारी संध्याकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारच्या सुमारास धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.
दरम्यान, धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मध्यरात्री दोन वाजता खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात प्रवेश झाला. शुभांगी पाटील यांनी मविआच्या तिकीटावर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. जवळपास 50 हजार मतं त्यांना पडली होती.
ही बातमी वाचा:
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.