IND vs ENG: भारताच्या पराभवाचं खरं कारण समोर! अवघ्या दोन षटकांत इंग्लंडने…
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्धच्या IND vs ENG 2nd T20 दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा England beat India by 4 wickets लागला. प्रथम फलंदाजी करताना 190 धावांचा डोंगर उभारूनही, भारतीय गोलंदाजांना त्या धावांचे रक्षण करता आले नाही. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविराुद्ध यशस्वीरीत्या धावांचा पाठलाग करण्याचा इंग्लंडने नवा विक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी 2012 मध्ये वानखेडे स्टेडियमवर 178 धावांचे लक्ष्य गाठणे ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. भारताने भक्कम धावसंख्या उभारली असली तरी, दुसऱ्या डावातील दोन षटकांनी त्यांच्या विजयाच्या आशा मावळल्या. चला तर मग, या सामन्यातील निर्णायक वळणांवर एक नजर टाकूया…
इंग्लंडच्या डावादरम्यान, तिसरे षटक Arsdeep Singh (अर्शदीपने टाकलेले) आणि 17 वे षटक Ravi Bishnoi (रवी बिश्नोईने टाकलेले) यांनी इंग्लंडला सामन्यात पुन्हा आणले ज्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. अर्शदीपने त्या षटकात 27 धावा दिल्या, तर बिश्नोईने एका महत्त्वपूर्ण षटकात 29 धावा दिल्या. यामुळे भारताच्या हातातून विजय निसटला. इंग्लंडची अवस्था जेव्हा 2 बाद 11 अशी बिकट होती, तेव्हा अर्शदीपने महागडे षटक टाकले आणि यजमानांना सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. दुसरीकडे, बिश्नोईच्या षटकात ज्यात दोन ‘नो-बॉल्स’चा समावेश होता जेकब बेथेलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली आणि सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकवला.
इंग्लंड संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यजमान संघासाठी जेकब बेथेल विजयाचा नायक ठरला. त्याने नाबाद 76 धावांची खेळी केली. इंग्लंडने 19 षटकांत हा विजय निश्चित केला. इंग्लंड संघाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर फिलिप सॉल्टची (0) विकेट गमावली होती आणि त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर जोस बटलर (0) देखील पॅव्हेलियनमध्ये परतला. अवघ्या एका धावेवर इंग्लंडने दोन्ही सलामीवीरांना गमावले होते. तिथून पुढे, कर्णधार हॅरी ब्रुकने बेथेलच्या साथीने डाव सावरला आणि तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 23 चेंडूंत 50 धावांची भागीदारी केली.
15 चेंडूंत 39 धावा काढून ब्रुक बाद झाला, त्यानंतर बेथेलने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. टॉम बँटन (39) याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी आणि सॅम करन (7) याच्यासोबत आणखी 46 धावांची भर घालून त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बेथेल 46 चेंडूंमध्ये 76 धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत पाच षटकार आणि तितकेच चौकार लगावले. रवी बिश्नोई भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला, त्याने आपल्या चार षटकांत एकही बळी न घेता 60 धावा दिल्या. ज्यात त्याचा इकॉनॉमी रेट 15 इतका खराब राहिला. अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले असले, तरी त्याचे एक महागडे षटक इंग्लंडच्या पुनरागमनात निर्णायक ठरले.
Comments are closed.