स्टम्प माईकमध्ये वैभव अन् अभिषेकचं संभाषण रेकॉर्ड झालं, क्रिकेटविश्वात चर्चा, ओल्ड ट्रॅफर्डच्या
अभिषेक शर्माने वैभव सूर्यवंशी यांचा सल्ला घेतला: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 15 वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यादरम्यान मैदानावरचा एक असा प्रसंग समोर आला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आपला 50 वा सामना खेळणारा सीनियर खेळाडू अभिषेक शर्मा मैदानावर 15 वर्षांच्या वैभवकडून खेळपट्टीबाबत (Pitch) टिप्स मागताना दिसला आणि हे संभाषण स्टंप मायक्रोफोनमध्ये कैद झाले. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 बाद 190 धावा केल्या होत्या. भारताकडून अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 4.5 षटकांत 50 धावांची धडाकेबाज भागीदारी केली. 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता, तरीही त्याचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. सामन्यादरम्यान अभिषेक शर्माने वैभवला खेळपट्टीच्या स्वभावाबद्दल विचारले. अभिषेक शर्मा म्हणाला की, समोर मारू की मागे? तुला काय वाटतं? वैभव सूर्यवंशीने शांतपणे म्हणाला, बघून घ्या. डबल बाऊन्स होतोय, कारण चेंडू वेगाने आला नाही आणि बाऊन्सही कमी होता. पहिलाच सामना खेळणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाचा हा परिपक्वपणा आणि आत्मविश्वास पाहून क्रिकेट चाहते त्याचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक करत आहेत.
दोन्ही सलामीवीरांची कामगिरी
आपल्या पदार्पणाच्या सामन्यात वैभवने आक्रमक सुरुवात केली. त्याने 10 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. मात्र, विल जॅक्सच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या नादात तो स्टंप आऊट झाला. वैभव बाद झाल्यानंतर अभिषेकही लगेच बाद झाला. त्याने 24 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावांची खेळी केली.
पदार्पण दिवस, शहाणे शब्द फूट. #वैभवसूर्यवंशी 🗣️😌#ENGvIND 2रा T20I 👉 JioHotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग! pic.twitter.com/OoWd7lUbEy
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 4 जुलै 2026
सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम मोडीत!
या सामन्यात मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला आहे. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. पदार्पण करताना त्याचे वय अवघे 15 वर्षे आणि 99 दिवस इतके होते. यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने 16 वर्षे आणि 205 दिवस वय असताना पदार्पण केले होते. वैभवने सचिनचा हा अनेक वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
हे ही वाचा –
Comments are closed.