अरे चांगलं तर सुरू आहे…; टीम इंडियाच्या सलग पराभवानंतर सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया; न
सूर्यकुमार यादव ENG vs IND 2026 T20I वर : भारताला टी-20 वर्ल्ड कप 2026 चे जेतेपद मिळवून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला बीसीसीआय (BCCI) आणि निवडकर्त्यांनी संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या जागी श्रेयस अय्यर याच्याकडे टी-20 चे नवीन कर्णधारपद सोपवण्यात आले. मात्र, बोर्डाचा हा डाव आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे. श्रेयस अय्यर हा आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्या चार टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यांपैकी एकही सामना न जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला असून, त्याच्या नावावर या लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान पत्रकारांनी सूर्यकुमार यादवला विचारले की, “चाहते तुम्हाला भारतीय जर्सीमध्ये खूप मिस करत आहेत.” यावर सूर्यकुमारने अत्यंत साधे आणि थेट उत्तर दिले.
सूर्यकुमार यादवने कोणीतरी स्वयंपाक केला
जेव्हा एक पॅप्स म्हणाला, “टीम इंडियामध्ये आम्हाला तुझी आठवण येते,” तेव्हा त्याचे उत्तर ऐका…. 😂🔥 pic.twitter.com/toXDuoH2Vf
— जरा (@JARA_Memer) 4 जुलै 2026
“मला? अरे, सगळं चांगलं तर सुरू आहे…”
मीडियाशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘मला? अरे, सगळं चांगलं तर सुरू आहे’, त्याचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वच जण हसू लागले. या संभाषणाची ही लहानशी क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून चाहत्यांनी ती मोठ्या प्रमाणावर शेअर केली आहे. श्रेयस अय्यरला कर्णधार बनवल्यानंतर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितले होते की, हा निर्णय खेळाडूंचा फॉर्म आणि संघाच्या भविष्यातील योजना लक्षात घेऊन घेण्यात आला आहे. मात्र, सूर्यकुमारला संघात न सामावून घेण्याचा मुद्दा सध्या भारतीय टी-20 क्रिकेट जगतात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
सूर्यकुमारच्या अनुभवाची भासतेय उणीव
अनेक चाहत्यांचे असे मत आहे की, टीम इंडियाला सध्या मिडल ऑर्डरमध्ये सूर्यकुमार यादवच्या अनुभवाची आणि त्याच्या तुफानी फलंदाजीची प्रचंड उणीव भासत आहे. भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देण्यात सूर्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्याला या फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जाते. संघात स्थान न मिळूनही 35 वर्षीय सूर्यकुमार यादव कोणत्याही वादापासून दूर राहिला आहे. या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तो जाहीरपणे संघाचे समर्थन करत आहे. सूर्याच्या या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होते की, तो या परिस्थितीला अत्यंत सकारात्मक आणि सहजतेने घेत आहे.
वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक डेब्यू; सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला
शनिवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावून 190 धावा केल्या. या सामन्यात अवघ्या 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वैभव सूर्यवंशी हा वयाच्या 15 वर्षे आणि 99 व्या दिवशी भारताकडून खेळणारा सर्वात युवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. यासह त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अनेक वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला. वैभवने आपल्या पहिल्या डावात 10 चेंडूंत 14 धावा केल्या, ज्यामध्ये दोन षटकारांचा समावेश होता.
मालिकेतील पुढील सामन्यांचे वेळापत्रक :
- तिसरा सामना: 7 जुलै (नॉटिंगघम)
- चौथा सामना: ९ जुलै (ब्रिस्टल)
- पाचवा सामना: 11 जुलै (साउदॅम्पटन)
हे ही वाचा –
Comments are closed.