मविआचा अजून एक आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात? संजय राऊतांनी नावही सांगितलं
संजय राऊत: महाविकास आघाडीतील आणखी एक आमदार एकनाथ शिंदेंच्या (मराठी) संपर्कात असल्याचा धक्कादायक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आमदाराला ऑफर देण्यात आली आहे. तो आमचा आमदार नाही. विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, चर्चा सुरु असता, अमुक माणसाला ऑफर देण्यात आली आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊतांनी आगामी काळात एकनाथ शिंदे मविआचा आणखी एक आमदार फोडू शकतात, असे म्हटले. (Maharashtra Politics news)
माझ्या कानावर आले आहे की, लिंगाडे नावाचे आमदार आहेत त्यांना 20 कोटी रुपयांची ऑफर आली आहे. काल परवाची गोष्ट आहे. धीरज लिंगाडे (MLA Dhiraj Lingade) हे काँग्रेसचे विधान परिषदेतील (Vidhan Parishad) आमदार आहेत. त्यांना शिंदे गटाकडून 20 कोटी रुपयांची ऑफर आणि आगामी निवडणुकीत आमदारकी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीला आराम पडो. तुमच्या हातात अफाट सत्ता, यंत्रणा आणि राम मंदिरातील लुटलेला पैसा आहे. हा राम मंदिरातून लुटलेला पैसा आहे. हा पापाचा पैसा पचणार नाही. जे सहा फुटीर खासदार असतील, त्यांना हा पैसा तुम्हाला आणि तुमच्या मुलाबाळांना पचणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. हिंदुत्त्वाचे धर्मग्रंथ, वेद-पुराण वाचा. रामकृष्णही आले गेले, तेही जगले नाहीत. महाभारताचं युद्ध त्यांनी जिंकलं, सगळ्यांना जावं लागलं. मोदी अमर आहेत का, अमित शाह अमर आहेत का, फडणवीस-शिंदे अजराअमर आहेत का?, असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Maharashtra Politics: संजय राऊतांच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी पदवीधरचे आमदार लिंगाडे यांना महायुतीकडून 20 कोटीची ऑफर असल्याचा दावा केल्यानंतर भाजप आमदार पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एखाद्या लोकप्रतिनिधीबद्दल संजय राऊत यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यांच्या याच वक्तव्यांमुळे त्यांच्या पक्षातील लोक त्यांना सोडून जात आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Uddhav Thackeray: सचिन अहिर फुटल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे सावध, पक्षातील सर्व आमदारांना आदेश धाडला; मंगळवारी मातोश्रीवर तातडीची बैठक
खासदार – आमदार फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांची बैठक बोलावली आहे. मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सचिन अहिर यांच्या फुटीनंतर बैठक बोलवली असल्याची माहिती आहे. ठाकरे गटातील आणखी काही आमदार फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Comments are closed.