भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याची वेळ बदलली! आता 7 वाजता नाही, तर 3 तास उशिरा सुरू होणार म

भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा T20 वेळ बदलला : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दोन सामने पूर्ण झाले असून आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने दमदार कामगिरी करत भारताचा पराभव केला. त्यामुळे मालिकेत पुनरागमन करण्यासाठी टीम इंडियासाठी तिसरा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, तिसऱ्या टी-20 सामन्याच्या वेळेत पुन्हा एकदा बदल झाला आहे. दुसरा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू झाला होता. त्यामुळे अनेक चाहत्यांना तिसराही सामना त्याच वेळेला होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे नसून हा सामना भारतीय वेळेनुसार तब्बल तीन तास उशिरा सुरू होणार आहे.

तिसरा टी-20 सामना रात्री 10 वाजता

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना 7 जुलै रोजी ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळवण्यात येणार आहे. हा डे-नाईट सामना असल्यामुळे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. त्याआधी रात्री 9.30 वाजता दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. मालिकेतील पहिला सामना देखील याच वेळेला खेळवण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या सामन्यातही भारतीय क्रिकेट चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत सामना पाहावा लागणार आहे.

मालिकेत बरोबरी साधण्याची भारतासमोर संधी

पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना भारतासाठी करो किंवा मरो अशा स्थितीचा ठरणार आहे. हा सामना जिंकण्यात भारताला यश आले तर मालिकेतील बरोबरीची संधी कायम राहील.

श्रेयस अय्यरसमोर पहिल्या विजयाचे आव्हान

कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आतापर्यंत चार टी-20 सामने खेळले असले तरी एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारताला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता, तर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही संघाला हार पत्करावी लागली. गेल्या काही वर्षांत भारतासाठी अशी परिस्थिती क्वचितच पाहायला मिळाली आहे. आता नॉटिंगहॅममध्ये होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडिया दमदार पुनरागमन करते की इंग्लंड मालिकेवरील पकड अधिक मजबूत करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

टीम इंडियाचा संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवि बिश्नोई, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव आणि सूर्यांश शेडगे.

हे ही वाचा –

Sri Lanka A vs India A 2nd Test : एकाने धावा केल्या, दुसऱ्याने 10 विकेट्स घेतल्या; सुदर्शन-गुरनूर ब्रारने श्रीलंकेच्या संपूर्ण टीमला गुडघ्यावर आणले, टीम इंडियाचा एकतर्फी विजय

Comments are closed.