पं. चंद्रकांत लिमये यांना ‘स्वरांजली’, रवींद्र नाटय़मंदिरात 17 जुलै रोजी मैफल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पु. ल. कट्टा उपक्रमांतर्गत प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात शुक्रवार, 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ’स्वरांजली’ ही सांगीतिक मैफल रंगणार आहे. या मैफलीच्या माध्यमातून पं. चंद्रकांत लिमये यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग व पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज, मुकुंद मराठे, अतुल ताडे, मकरंद कुंडले, पं. राजा काळे सहभागी होणार आहेत. पं. चंद्रकांत लिमये यांच्या गुरुकुलातील शिष्य यावेळी सादरीकरण करतील. कलेच्या आनंदासह विचारांची मेजवानी देणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments are closed.