इंग्लंडमध्ये पाऊल टाकताच रोहित शर्मा मिशन मोडमध्ये! टी-20ची चूक पुन्हा नाही; आता फक्त 20 धावा अ
रोहित शर्मा IND vs ENG एकदिवसीय मालिका : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आगामी इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित आता केवळ एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, सामन्यांमधील दीर्घ अंतरामुळे फॉर्म आणि फिटनेसवर परिणाम होऊ नये, यासाठी रोहितने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो भारतीय संघातील इतर खेळाडूंच्या सुमारे एक आठवडा आधीच लंडनमध्ये दाखल झाला असून त्याने थेट मैदानात उतरून मिशन मोडमध्ये सराव सुरू केला आहे.
दुखापतीनंतरचे पुनरागमन अन् सरावावर भर (Rohit Sharma IND vs ENG ODI Series)
आयपीएल 2026 दरम्यान रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे त्याला काही महत्त्वाचे सामने गमवावे लागले होते. मात्र, दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार पुनरागमन केले. या मालिकेतील 3 डावांत रोहितने 143 धावा ठोकल्या, ज्यात तिसऱ्या सामन्यात 79 धावांच्या वादळी खेळीचा समावेश होता. आता 39 वर्षांचा असलेला रोहित कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. लंडनमध्ये तो स्थानिक क्लबच्या गोलंदाजांचा सामना करत नेटमध्ये तासनतास घाम गाळत आहे, जेणेकरून मालिका सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे मॅच-फिट होऊ शकेल. सरावाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेत तो तिथे आपल्या जवळच्या मित्रांची भेट घेत आहे.
इंग्लंडच्या भूमीवर रोहितचा दबदबा (Rohit Sharma IND vs ENG ODI Series)
इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर रोहित शर्माची बॅट नेहमीच तळपली आहे. त्याने इंग्लंडमध्ये 27 डावांमध्ये तब्बल 65 च्या सरासरीने 1,428 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 7 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांचा विचार केला, तर रोहितने 47 च्या सरासरीने 846 धावा केल्या असून त्यात 3 शतके आणि 4 अर्धशतके आहेत.
इंजमाम-उल-हकचा ऐतिहासिक विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी (Rohit Sharma IND vs ENG ODI Series)
या मालिकेत रोहित शर्मा एका मोठ्या वैयक्तिक विक्रमाला गवसणी घालणार आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज फलंदाज इंजमाम-उल-हक याला मागे टाकण्यासाठी रोहितला केवळ 20 धावांची आवश्यकता आहे. इंजमाम-उल-हकने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11,739 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माने 285 सामन्यांत 11,720 धावा केल्या. ज्यात 33 शतक आणि 62 अर्धशतके ठोकली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 याहून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्माचा स्ट्राईक रेट (92.97) हा जगात सर्वात सर्वोत्तम आहे.
रोहित-विराट जोडी पुन्हा एकत्र मैदानात
भारतीय चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली ही अनुभवी जोडी पुन्हा एकदा एकत्र फलंदाजी करताना दिसेल. विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळू शकला नव्हता, मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन संघात परतत आहे.
मालिकेचे वेळापत्रक :
पहिला सामना : 11 जुलै – एजबेस्टन, बर्मिंगहॅम
दुसरा सामना : 16 जुलै – सोफिया गार्डन्स, कार्डिफ
तिसरा सामना : 19 जुलै – लॉर्ड्स, लंडन
हे ही वाचा –
Comments are closed.