Dapoli News – मंडणगड म्हाप्रल दरम्यान शेनाळे हद्दीतील देशमुख बागेजवळील रस्त्यावर कोसळलेली दरड हटवण्याचे काम सुरुच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मंडणगड म्हाप्रल दरम्यानचा नव्याने तयार होत असलेल्या लोणंद राजावाडी ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गावर शेनाळे महसुली गावाच्या हद्दीतील देशमुख बागेजवळून जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी उशिरा अतिवृष्टीमुळे येथील डोंगराचे भुस्खलन होवून दरड कोसळून माती दगड धोंडे झाडे झुडपे आदी मोठ्या प्रमाणात मलबा रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. सायंकाळी घटना घडल्याने आणि पावसाचा वाढलेला जोर यामुळे रस्त्यावर कोसळलेली दरड बाजूला करणे अडचणीचेच होते त्याही परिस्थितीत प्रशासनाने मदत कार्य सुरू केले मात्र मोठ्या प्रमाणात आलेला मलबा आज शुक्रवारी तिस-या दिवशीही रस्त्यावरुन हटवण्याचे काम सुरूच आहे त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंदच आहे.

मंडणगड म्हाप्रल दरम्यानचा नव्याने तयार होत असलेल्या या मार्गावर मंडणगड आणि दापोली तसेच काही खेड तालुक्यातील गावांसाठी पूणे , मुंबई, ठाणे आदी महत्त्वाच्या शहरांकडे जाण्याकरिता खुपच महत्वाचा असा मार्ग आहे. अशा या मार्गावर असलेल्या आंबेत खाडी पुलाखाली पुराच्या पाण्याने वाहत येऊन अडकलेले बार्ज हटवून वाहतूक सुरळीत होत नाही तोच या मार्गावरील शेनाळे महसुली गावाच्या हद्दीत देशमुख बागेजवळील रस्त्यावर दरड कोसळून रस्ता बंद पडण्याची दुसरी घटना घडली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मलबा आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा एकदा बंद पडला. त्यामुळे या मार्गाचे महत्त्व लक्षात घेऊन या मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे सुरू करण्यासाठी यांत्रिकिकरणांच्या सहाय्याने मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .

या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाड येथील अभियंता अभिजीत झेंडे यांनी शेनाळे देशमुख बागेजवळ कोसळलेली दरड दोन्ही बाजूने हटविण्यात येत आहे. या कामी २ जेसीबी, १ लोडर व ७ डंपर कार्यरत करण्यात आले आहेत शक्य तितक्या लवकर रस्ता वाहतूकीस योग्य करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र डोंगराकडील दरड मोठ्या प्रमाणावर खचल्याने रस्त्यावर आलेली माती दगड व झाडे साफ करण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. या कामी स्थानीक ग्रामस्थांचे मार्गदर्शन व सुचना लक्षात घेऊन पुढील कार्यवाही पुर्ण कऱण्याचे काम सुरू आहे.

Comments are closed.