मुंबईच्या मोकळ्या जागा धोक्यात, मोकळी मैदानं मातीचीच राहिली पाहिजेत; आदित्य ठाकरे यांनी टोचले सरकारचे कान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईतील मोकळ्या मैदानांच्या आणि जागांच्या सुरक्षेचा मुद्दा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत जोरदारपणे उचलून धरला. “मुंबईतील मोकळी मैदाने ही मातीचीच राहिली पाहिजेत,” अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी या जागा गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तींवर आणि सरकारच्या धोरणात्मक त्रुटींवर बोट ठेवले. तसेच केअर टेकर पॉलिसी आणि आरजी-पीजी प्लॉट्सच्या हस्तांतरणावरून त्यांनी सरकारचे चांगलेच कान टोचले.

विधानसभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मुंबईच्या मोकळ्या जागा धोक्यात आल्या आहेत. त्या वाचवण्यासाठी आपण एकत्र यायला हवे. मोकळी मैदान मातीचीच राहिली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. केअर टेकर पॉलिसी प्रलंबित असली तरी कोणती न कोणती ट्रस्ट कुठच्या न कुठच्या मैदानावर आहे.”

ते म्हणाले, “नेपियन्सी रोडला प्रियदर्शिनी पार्क आहे, तिथे पीडीपीची स्वतःची ट्रस्ट आहे. केअर टेकर पॉलिसी आहे की, नाही आणि कुठच्या निकषावर देणार, ह्याविषयी निर्णय घेतला पाहिजे. टर्फ परवानगी, फायर ऑडिट केले आहे की नाही, हा विषयही आहे. जिथे जिथे नवीन कन्स्ट्रक्शन सुरू आहे, जिथे बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स काम करत आहेत, त्यांच्याकडून रहिवाशांसाठीच्या सुविधा, आरजी किंवा पीजी प्लॉट्स वेळेत ताब्यात आले पाहिजेत. या प्राईम जमिनींच्या सुरक्षेसाठी रोड फेन्सिंग वेळेवर लावले गेले पाहिजे. याचा देखील विधेयकात समावेश असावा.”

Comments are closed.