भारताच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठे बदल! सपोर्ट स्टाफमधील किमान एक प्रमुख सदस्य संघ सोडून जाण्याची शक्यता

भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाची इंग्लंड दौरा २०२६ ची सुरूवात खूपच निराशाजनक झाली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत खेळलेले तिन्ही टी २० सामने गमावले आहेत. त्याने पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत भारत ३-० असा पिछाडीवर आहे. मालिकेतील एका सामन्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. संघाने मालिका गमावला असून त्यांची कामगिरी पाहता त्याचे परिणाम काय होतील हे लवकरच कळेल, मात्र सध्या तर संघाच्या प्रशिक्षक मंडळामध्ये बदल होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक मंडळात (कोचिंग सपोर्ट स्टाफ) मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सपोर्ट स्टाफमधील किमान एक प्रमुख सदस्य संघ सोडून जाणार आहे.

हा संभाव्य राजीनामा त्या सदस्याच्या सध्याच्या भुमिकेमुळे काम करण्याबद्दलच्या वाढत्या नाराजीमुळे आहे की तो नवे प्रशिक्षक पद स्वीकारण्यासाठी जात आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही.

नुकतेच गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याने जुलै २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेने मुख्य प्रशिक्षकाच्या कारभाराला सुरूवात केली होती.

विशेष बाब म्हणजे, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल बांगलादेश कसोटी मालिकेआधी थोड्या उशिराने प्रशिक्षक संघात सामील झाले होते. तसेच उर्वरित सहाय्यक प्रशिक्षकही किंवा कर्मचारी यांनी गंभीरसोबत आपल्या कारभाराला सुरूवात केली होती.

सपोर्ट स्टाफने भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (बीसीसीआय) २+१ करार केला असल्याचे समजते. सुरूवातीच्या दोन वर्षांनंतर क्रिकेट बोर्ड आणि प्रशिक्षकांना आपला कार्यकाळ वाढवण्याचा पर्याय आहे, मात्र किमान एक प्रशिक्षकाने एका आयपीएल फ्रॅंचायझीसोबत चर्चा केली असून तो त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

हा बदल भारतीय संघाच्या आयर्लंड आणि इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीमुळे नाही. तसेच संघ व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर जाणार आहे, हा बदलही लक्षात घेण्याजोगा आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी शुक्रवारी एक निवेदन जाहीर केले होते. त्यामध्ये त्यांनी संघाच्या अलीकडील कामगिरीचा आढावा घेतला जाईल, यावर भर दिला, मात्र इतर कोणत्याही गोष्टींवर चर्चा केली जाणार नाही, हे स्पष्ट केले.

भारतीय संघात सध्या गंभीर आणि मॉर्केल (गोलंदाजी प्रशिक्षक) यांच्याबरोबर रायन टेन डोशेट (सहाय्यक प्रशिक्षक) आणि अभिषेक नायरही सपोर्ट स्टाफमध्ये आहेत. टी दिलीप यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले, तर सितांशु कोटक यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारताने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर नायर यांना त्यांच्या कार्यकाळातून मुक्त करण्यात आले.

Comments are closed.