लग्न झालं अन् दोन महिन्यातच समजलं बायकोचं अफेअर, पत्नीसह तिच्या प्रियकरानं त्याच्यासोबत नको ते
मोहोळ: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक मन सुन्न करणारी (Solapur Crime News) घटना समोर आली आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाने आपल्या पत्नीच्या आणि तिच्या प्रियकराच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळफास (Solapur Crime News) घेत आपली जीवनयात्रा संपवली. लग्न होऊन अवघे दोन महिनेच झाले असताना तरुणाने हे टोकाचे (Solapur Crime News) पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.(Solapur Crime News)
Solapur Crime News: लग्नानंतर समोर आले प्रेमसंबंध
मोहोळ तालुक्यातील यावली गावचा रहिवासी असलेला २६ वर्षीय संजय राजाराम राऊत याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. मात्र, विवाह झाल्यानंतर संजयला समजले की त्याच्या पत्नीचे आधीपासूनच दुसऱ्या एका तरुणावर प्रेम आहे. या विषयावरून त्यांच्यात वारंवार खटके उडू लागले. त्यातच संजयची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ सदाशिव शिंदे (रा. कोडी, ता. उत्तर सोलापूर) यांनी मिळून संजयला त्रास देण्यास सुरुवात केली.(Solapur Crime News)
पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या या संबंधांमुळे संजयचा संसार पूर्णपणे विस्कळीत झाला होता. हे दोघेही संजयला सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत असल्याचा आरोप संजयच्या वडिलांनी केला आहे. या सततच्या त्रासामुळे आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीने खचून जाऊन संजयने शुक्रवार, १० जुलै रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.(Solapur Crime News)
Solapur Crime News: वडिलांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा
संजयच्या अचानक जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर मयत संजयचे वडील राजाराम नागनाथ राऊत यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. आपल्या मुलाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या छळाला कंटाळूनच हे पाऊल उचलल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वडिलांच्या या तक्रारीवरून मोहोळ पोलिसांनी मृत तरुणाची पत्नी आणि तिचा प्रियकर सौरभ शिंदे या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत.(Solapur Crime News)
Comments are closed.