सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढले, खात्यात पाठवले पैसे; पाकिस्तानी दहशतवादी भट्टीचा डाव ए
Shahajad Bhatti News : पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी (Shahajad Bhatti) नेटवर्कवर एटीएसने कारवाई केली आहे.पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि हँडलर शहजाद भट्टी सोशल मीडिया (व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम) द्वारे भारतीय तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी चिथावणी देत आहे. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसने (ATS) राज्यभर मोठी चौकशी मोहीम हाती घेतली आहे. एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने मराठवाडा भागातून १५ संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली आहे. यात खालील ठिकाणच्या संशयितांचा समावेश आहे. १० संशयित: छत्रपती संभाजीनगर (CSN), ०२ संशयित: धाराशिव, ०१ संशयित:बीड०२ संशयित: जालना येथील आहेत. ताब्यात घेतलेल्या या सर्व १५ संशयितांचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कसून तपासणी केली जात असून, त्यांचे शहजाद भट्टीच्या (Shahajad Bhatti) नेटवर्कशी असलेले डिजिटल धागेदोरे शोधण्यासाठी हे सर्व डिजिटल डिव्हाइसेसची तपासणी करणे सुरू आहे. या नेटवर्कचा धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एटीएसचे चौकशी सत्र सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे. याप्रकरणी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी माहिती देताना सांगितलं की, पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी याने काही तरुणांनाच्या खात्यात पैसे पाठवल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आले आहे. (Shahajad Bhatti)
Shahajad Bhatti News : गरज वाटल्यास काही तरुणांना अटक देखील केली जाईल
आतपर्यंत 157 तरुण हे संशयाच्या भोवऱ्यात असून त्यापैकी 100 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गरज वाटल्यास काही तरुणांना अटक देखील केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. शहजाद भट्टी याचा भारतात काही घातपात घडवण्याचा कट होता का याचा पण तपास केला जात असल्याचे भोयर यांनी सांगितले. पाकिस्तानी गँंगस्टर शहजाद भट्टी याने काही तरुणांच्या खात्यामध्ये पैसे पाठवल्याचे एटीएसच्या तपासात पुढे आलं आहे. आतापर्यंत 157 तरुण हे संशयाच्या भोवऱ्यात असून त्यापैकी 100 तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. गरज वाटल्यास काही तरुणांना अटक देखील केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे. शहजाद भट्टी (Shahajad Bhatti) याचा भारतात काही घातपात घडवण्याचा कट होता का? याचा पण तपास केला जाणार असल्याचं भोयर यांनी सांगितलं आहे. (Shahajad Bhatti)
Shahajad Bhatti News : सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर वॉच ठेवून होती
शहाजाद भट्टी नावाचा आतंकवादी पाकिस्तानमध्ये बसून महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काही हिंसात्मक घटना घडवून आणता येतात का याचा प्रयत्न करत होता, सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी काही तरुणांना हाताशी पकडलं होतं त्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले होते. परंतु ही माहिती वेळीच एटीएसला मिळाल्यामुळे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 157 ठिकाणी एटीएसने त्या ठिकाणी धाडीत टाकलेल्या आहेत आणि 100 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलेले आहे, लवकरच पुढची कार्यवाई त्या ठिकाणी करण्यात येईल, यात विदर्भातले 10 तरुण आहे याव्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातले लोक, तरुण याच्यामध्ये आहेत, परंतु सगळी माहिती कारवाई सुरू असल्यामुळे आताच देता येणार नाही. एटीएस मागच्या अनेक दिवसापासून यांच्यावर पाळत ठेवून होते. कुठेतरी शहाजाद भट्टीचा आपल्या देशामध्ये काहीतरी घातपात करण्याचा कट आहे असं काही निदर्शनात येत का याच्यात नुकतीच त्यांनी झारखंडमध्ये एका ठिकाणी घटना घडली होती, त्याच्यामुळे संपूर्ण भारतातली यंत्रणा सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर वॉच ठेवून होती, आता महाराष्ट्रातल्या एटीएसला जेव्हा हे लक्षात आलं तर महाराष्ट्र एटीएसने देखील कार्यवाई केली, 100 मुलांची चौकशी झालेली आहे, यामध्ये काहींना अटक होऊ शकते, आता प्राथमिक चौकशी चालू आहे. ज्याचा थेट संबंध त्याच्याशी आला असेल आणि चुकीचं काम केलं असेल तर निश्चितपणेकाही लोकांना अटक होईल, अशी माहिती पंकज भोयार यांनी सांगितलं आहे.
Comments are closed.