डॉ. गोपाल सोनी यांच्या मृत्यूने खळबळ; रात्री एकटेच शेतात गेले, 2 तासानंतर मृत अवस्थेत आढळले!

बुलढाणा क्राईम न्यूज : बुलढाणामधील खामगाव शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून एकमेव रक्तपेढी चालवणारे प्रख्यात डॉ. गोपाल सोनी (Dr. Gopal Soni Death) यांचा काल सायंकाळी त्यांच्या शेतात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. यामुळे जिल्हाभरात वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काल रविवार असल्याने डॉ. गोपाल सोनी हे एकटेच त्यांच्या शेतात गेले होते. त्यानंतर दीड ते दोन तासानंतर ते मृत अवस्थेत शेतात आढळल्याने हा मृत्यू नेमका कशामुळे झाला..? याबद्दल वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल आहे. (Buldhana Crime News)

डॉ.गोपाल सोनी हे खामगाव शहरातील प्रख्यात पॅथॉलॉजिस्ट व सोनी रक्तपेढीचे संचालक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णांना चांगली सेवा देत असल्यामुळे जिल्हाभर त्यांचा चांगला परिचय होता. मात्र त्यांच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत. दरम्यान रात्री उशिरा खामगाव पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी सुरू असून अशा प्राख्यात डॉक्टरांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक घातपात याविषयी खामगाव ग्रामीण पोलीस चौकशी करत आहेत. (Dr. Gopal Soni Buldhana)

रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण- (Raigad News)

रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते काल रात्रीच्या सुमारास सुधागड तालुक्यातील नेरे गावातील  पोलीस पाटील (चंद्रकांत पोकळे ) हे आपल्या घरी जात असताना त्यांच्यावर त्यांच्याच गावातील 7 ते 8 मुलांनी अचानक हल्ला चढवत बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पोलीस पाटील पोकळे हे गंभीर जखमी झालेत. गावातील मुलांचा वाद सोडवण्यासाठी पोकळे यांनी मध्यस्थी केली होती. मात्र याचा राग मनात धरुन येथील तरुणांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला,पोकळे यांच्यावर करण्यात आलेली मारहाण यामध्ये त्यांच्या डोळ्यांना पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यासंबंधात पाली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणी पाली पोलिसांकडून मारहाणा करणाऱ्या तरुणांचा तपास सुरू आहे.पोकळे यांच्यावर सद्यस्थितीमध्ये शासकीय जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे उपचार सुरू आहेत.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Nagpur Crime : पॅरोलवर सुटला अन् मित्राच्या मदतीनं पुन्हा तेच कृत्य केलं, पोलिसांनी घर गाठताच तुरुंगात जमा झाला; पण दाम्पत्याची लूट करणाऱ्या चोरट्याचा डाव अखेर फसला

Comments are closed.