आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणें
बीड: “भरणे मामा, तुमचा भाचा तुम्हाला दोन-तीन दिवसांपासून फोन करतोय… जिल्ह्यात पाऊस नाही, मुलांची लग्न होईनात, आमची सरसकट कर्जमाफी करा!” एका तरुण शेतकऱ्याने थेट राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून मांडलेली ही व्यथा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील युवा शेतकरी अशोक माने यांनी कृषीमंत्र्यांना केलेल्या या फोनची कॉल रेकॉर्डिंग समोर आली असून, यामुळे बीडमधील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.(Beed News)
Beed News: शेतकरी दुहेरी संकटात; पेरण्या संकटात
बीड जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत आहे. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते, तर यावर्षी कडक उन्हाळ्यामुळे शेतकरी आधीच त्रस्त होता. त्यातच यंदा पावसाने दगा दिल्यामुळे पेरण्यांवर मोठे संकट ओढवले आहे. आष्टी भागात अद्यापही म्हणावा तसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत ग्रासला आहे.
बीड न्यूज : “आटी रद्द करा, सातबारा कोरा करा!”
याच परिस्थितीला कंटाळून आष्टीतील अशोक माने या तरुण शेतकऱ्याने थेट कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावला. गेल्या तीन दिवसांपासून आपण कृषीमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा अशोकने केला आहे. कृषीमंत्र्यांशी बोलताना या तरुणाने अत्यंत आर्त भाषेत आपली व्यथा मांडली. “शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने ज्या जाचक अटी घातल्या आहेत, त्या तातडीने रद्द करा. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करून त्यांना दिलासा द्या,” अशी मागणी या तरुणाने केली.
Beed News: “लग्न सुद्धा होत नाहीत…”
बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेती उद्ध्वस्त झाली आहे, आर्थिक कोंडी झाल्यामुळे ग्रामीण भागात मुलांची लग्न जमणे देखील कठीण झाले आहे, ही वस्तुस्थिती या तरुणाने कृषीमंत्र्यांसमोर मांडली. “पाऊसही नाही आणि मुलांची लग्न सुद्धा होत नाहीत,” ही त्याची हतबलता ऐकून प्रशासनाने आणि सरकारने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
आष्टीतील युवा शेतकरी अशोक माने यांचा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना केलेल्या फोनची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे तर यावर्षी उन्हामुळे बीडमधील शेतकरी त्रस्त झालेला आहे.त्यातच यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने त्याचा परिणाम पेरण्यावरही झाला. बीड मधील आष्टी भागात अद्यापही म्हणावा तासा पाऊस पडलेला नाही. दरम्यान याच आष्टीतील युवा शेतकरी अशोक माने यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करत आपली व्यथा मांडली आहे. तीन दिवसापासून हा तरुण कृषीमंत्र्यांना फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला. कृषी मंत्र्यांशी बोलताना सदरील तरुणाने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ज्या अटी घातल्या आहेत. त्या रद्द करून सरसकट सातबारा सरसकट कोरा करण्याची मागणी केली. करावा बीड जिल्ह्यात पाऊस सुद्धा नाही मुलांची लग्न सुद्धा होत नाहीत. अशी व्यथा ही सदरील तरुणाने कृषिमंत्र्याकडे मांडली आहे.
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Comments are closed.