‘फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या’; महायुतीकड
मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी : राज्यात सध्या मुख्यमंत्रीपदाबाबत (Chief Minister Post) अचानक चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत जाणार असल्याचा दावा वारंवार केला जात आहे. खासदार संजय राऊत यांनी “देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज्यात चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील, गिरीश महाजन हे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत,” असे वक्तव्य केले होते. तर दुसरीकडे, आमदार बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) हेच पुन्हा राज्याची धुरा सांभाळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही उडी घेतली. गिरीश महाजन हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचा दावा खडसे यांनी केला. एकनाथ खडसे यांच्या या खळबळजनक विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडूनही मुख्यमंत्रीपदासाठी थेट दावा ठोकण्यात आला आहे.
NCP on Chief Minister Post: आता राष्ट्रवादीकडूनही मुख्यमंत्रीपदावर दावा
नंदुरबार येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देण्याची मागणी करत सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे केले आहे. अभिजित मोरे म्हणाले की, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे. भाजपचे शीर्ष नेतृत्व अतिशय समजूतदार असल्याने ते राष्ट्रवादीला नक्कीच संधी देतील. महायुतीत पहिल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण होत आला आहे. त्यामुळे उर्वरित अडीच वर्षांचा कार्यकाळ हा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावा.
NCP on Chief Minister Post: सुनेत्रा पवार यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे
सध्या देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये मोठी संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत, त्यामुळे हे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देऊन महायुतीने देशासमोर एक नवे उदाहरण निर्माण करावे. मुख्यमंत्रीपदाबाबत जर अशी चर्चा सुरू असेल, तर सुनेत्रा पवार यांनाच मुख्यमंत्री केले पाहिजे. स्वर्गीय अजितदादांनी महाराष्ट्रात जो पुरोगामी विचार रुजवला, त्या विचाराला पुढे नेण्याचे काम खऱ्या अर्थाने सुनेत्रा पवार करत आहेत.
NCP on Chief Minister Post: ती खऱ्या अर्थाने अजितदादांना दिलेली श्रद्धांजली ठरेल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असे वाटते की, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार व्हाव्यात. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचाच राहणार आहे. याआधी महायुतीने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली होती, त्यामुळे महायुतीचा एक प्रमुख घटक पक्ष म्हणून आता राष्ट्रवादीलाही ही संधी मिळायला हवी. महायुतीच्या नेतृत्वाने जर सुनेत्रा पवार यांना ही संधी दिली, तर ती खऱ्या अर्थाने स्वर्गीय अजितदादांना दिलेली श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Comments are closed.