टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि ‘मैत्री’ पाहून खेळाडूंची निवड; गंभीर-अय्यरवर आरोप
मुंबई : दोनवेळा सलग विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला (Team India) सध्या एका एका विजयासाठी तरसावं लागत आहे. भारतीय संघाच्या या सुमार कामगिरीमुळे देशभरातील क्रिकेटप्रेमी अत्यंत संतप्त झाले आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाने एकूण 7 टी20 सामने खेळले. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर उर्वरित 6 सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया सलग 6 टी20 सामने हरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक पराभवानंतर आता संघाची निवड, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Team India Selection Issue : टीम इंडियावर वशिलेबाजी’चे गंभीर आरोप
क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, सध्या भारतीय संघात जे सुरू आहे, तसेच काहीसे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) नेहमी पाहायला मिळते. पाकिस्तानमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक आपल्या मर्जीतील किंवा जवळच्या खेळाडूंना संघात जागा देतात आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना डावललं जातं. असाच काहीसा प्रकार सध्या भारतीय संघातही सुरू असल्याचं बोललं जात आहे.
Team India Selection Controversy : सुमार कामगिरी तरीही संघात स्थान
वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई हे खेळाडू सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्यांना संघात वारंवार संधी का दिली जात आहे? असा सवाल चाहते विचारत आहेत.
श्रेयस अय्यर : श्रेयस अय्यरची 'गर्लफ्रेंड'?
सूर्यांश शेडगे या खेळाडूला संघात कोणत्या निकषावर घेण्यात आले? सूर्यांश हा कर्णधार श्रेयस अय्यरचा जवळचा मानला जातो. दोघेही एकाच देशांतर्गत संघातून खेळतात आणि आयपीएलमध्येही पंजाब किंग्सचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे संघात केवळ मैत्रीखातर निवड झाली का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
Team India Selection Dispute : हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीवर प्रश्न
हर्षित राणा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल खेळू शकला नव्हता. त्याला कोणतेही देशांतर्गत क्रिकेट न खेळवता थेट राष्ट्रीय संघात कसे घेतले गेले? असाच प्रश्न वरुण चक्रवर्तीबाबतही उपस्थित केला जात आहे.
Player Experience Ignored : अनुभवी खेळाडूंना का डावलले?
इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांच्याच मायभूमीत खेळताना भारतीय निवड समितीने (Selectors) अनुभवाला पूर्णपणे बगल दिल्याचं दिसतंय. जसप्रीत बुमराह संघात नसताना मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार किंवा मोहम्मद शमी यांसारख्या इंग्लंडमधील परिस्थितीचा अनुभव असलेल्या गोलंदाजांना संघात स्थान का दिले गेले नाही? फिरकी विभागातही कुलदीप यादवला जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे.
सर्वात मोठा धक्का म्हणजे, ज्या संजू सॅमसनने (Sanju Samson) आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताला एकहाती विश्वचषक जिंकून दिला, त्याला अचानक संघातून बाहेर का केले गेले? सोशल मीडियावरील दबावापोटी संघ व्यवस्थापन निर्णय घेत आहे का? आणि फलंदाजीच्या क्रमवारीत वारंवार बदल का केले जात आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
Club Level Fielding : क्लब लेव्हलसारखी कामगिरी
इंग्लंड आणि त्यापूर्वी आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी एखाद्या व्यावसायिक राष्ट्रीय संघासारखी नसून गल्लीबोळातील क्लब सारखी वाटत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. क्षेत्ररक्षणाचा (Fielding) दर्जा अत्यंत सुमार होता. भारतीय खेळाडूंनी अगदी सोपे झेल सोडले, चौकार अडवण्यात अक्षम्य चुका केल्या आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना सहज धावा काढू दिल्या.
दुसरीकडे, भारतीय फलंदाजांची ‘फ्लॅट पिच’वर खेळण्याची सवय पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. जिथे चेंडूला थोडासा टर्न मिळतो किंवा वेगवान गोलंदाजांना उसळी (Bounce) मिळते, तिथे भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला ही कमजोरी माहीत असूनही त्यानुसार योग्य संघ का निवडला गेला नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना द्यावी लागणार आहेत.
ही बातमी वाचा:
Comments are closed.