गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील 66 जणांची चौकशी एटीएसकडून पुणे,पिंपरीत छापे

टी. भा. प्रतिनिधी, पुणे
पाकिस्तानातील गुंड, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी संबंधित 66 जणांची राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी चौकशी केली. त्याअनुषंगाने एटीएसने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिह्यातील वेगवेगळ्या भागात कारवाई कऊन चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतले.

एटीएसच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. शहजाद भट्टी, त्याचे साथीदार अमजल गुज्जर, अबिट जाट, राणा हुसेन, अब्दुल मेनन, मुन्ना झिंगाडा, फारूख खोकर, जाफर सुपारी, सनी टायगर, शेख सलमान, सर्फराज डोंगर उर्फ जोरासिंग, अबू मुसा, सरकार हे समाज माध्यमातून काही तरुणांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती.

देशभरातील तरुणांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करत होता. त्यासाठी तो समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करत होता. एटीएसच्या पथकाने त्याअनुषंगाने 10 जुलै रोजी पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यभरात 200 ठिकाणी छापे टाकले.

एटीएसच्या पथकाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिह्यात तपास केला. शहजाद भट्टी आणि त्याच्या टोळीतील सराइतांच्या संपर्कात असलेल्या 66 जणांची मंगळवारी (14 जुलै) चौकशी केली. एटीएसच्या पथकाने वेगवेगळ्या भागात छापे टाकले. या प्रकरणात काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती ‘एटीएस’ मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

भट्टी आणि साथीदार

भट्टी आणि त्याचे साथीदार देशभरातील तरुणांशी समाज माध्यमातील संपर्क यंत्रणेचा वापर कऊन त्यांच्या संपर्कात होते. त्यांना संदेश पाठविणे, तसेच गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे संदेश पाठविण्यात येत होते. तरुणांना देशविघातक कारवाईसाठी भट्टी आणि साथीदार प्रवृत्त करत होते.

अशा तरुणांची चौकशी करुन त्यांना भट्टी आणि साथीदारांच्या विळख्यातून सोडविणे, तसेच गंभीर बाब आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी चौकशी करण्यात आली, असे एटीएसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सोशल मीडियाचा वापर आणि तरुणांना प्रलोभने:
तपासातील प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ’आयएसआय’ च्या सूचनेवरून शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार भारतात छुपे नेटवर्क चालवत होते. हे संशयित फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करून भारतीय तरुणांना संपर्कात येत असत.

तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करण्यासाठी सुऊवातीला पैशांचे आमिष, प्रसिद्धी किंवा परदेशात स्थायिक होण्याच्या भूलथापा दिल्या जात होत्या. अनेक बेरोजगार आणि संवेदनशील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात होता.

10 जुलै 2026 रोजी एटीएसने पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि इतर शहरांसह राज्यभरात एकाच वेळी धाडी टाकून मोठी मोहीम राबवली. संपूर्ण राज्यातून जवळपास 112 हून अधिक संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

पुण्यात यापूर्वी चाकण, वारजे आणि शिरूर परिसरातील तऊणांची या संदर्भात चौकशी करण्यात आली असून, त्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.
देशाच्या सुरक्षेला आव्हान
शहजाद भट्टीच्या या मॉड्युलचा मुख्य हेतू भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळवणे, फोटो/व्हिडिओ गोळा करणे आणि भविष्यातील घातपातासाठी स्लीपर सेल्स तयार करणे हा होता.

भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या हायब्रीड वॉरफेअरचा बिमोड करण्यासाठी एटीएसने कडक पावले उचलली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

Comments are closed.