विठूरायाच्या वारीत महिलांच्या डोक्यावर तुळस असण्यामागचं कारण काय?




Pandharpur Wari Tulsi Significance


विठू नामाचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद आणि डोक्यावर तुळशीचे रोप घेऊन चालणाऱ्या महिला वारकरी… पंढरीच्या वारीतील हे दृश्य महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवते. या वारीत डोईवर तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला चालताना मुखाने ‘माऊली माऊली’ देखील म्हणतात. वारीचा प्रवास हा लांबचा असतो. या संपूर्ण प्रवासात तुळशी वृंदावनाचा संपूर्ण भार डोक्यावर घेऊन वारकरी महिला चालत असतात. परंतू, त्यांच्या चेहऱ्यावर याचा कसुभरही थकवा दिसत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की वारीत महिलांनी डोक्यावर तुळस घेण्याची ही परंपरा कधी आणि का सुरू झाली? यामागे केवळ विठ्ठलाप्रती असलेली भक्ती आहे की काही वैज्ञानिक कारण? चला जाणून घेऊयात यामागील उत्तर.

धार्मिक कारणे

तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे. विष्णूंच्या पूजेत तुळस अर्पण केली जाते. तर पंढरीचा विठ्ठल हे विष्णूंचे रुप आहे, त्यामुळे तुळस जशी विष्णूंना प्रिय आहे तशीच विठूरायाला प्रिय आहे, अशी समज आहे.

वैज्ञानिक कारणे

तुळस प्राणवायू देते आणि कार्बन डायऑक्साइड शोषते. त्यामुळे डोक्यावर जेव्हा तुळस घेतली जाते तेव्हा प्रत्येक महिला 20 ते 25 फुटांपर्यतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवते. परिणामी सर्वाना शुद्ध हवा मिळते. याशिवाय तुळशीत ऍटीबॅक्टेरियल आणि ऍटीव्हायरल गुण असतात. या गुणांमुळे हवेतील बॅक्टेरिया कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या सर्वामुळे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहते. म्हणूनच की काय वर्षोनुवर्षे डोक्यावर तुळस घेऊन चालायची परंपरा आपल्याकडे आजही जपली जाते.

हेही वाचा – पंढरपूरला जाणं शक्य नाही? मग महाराष्ट्रातील या विठ्ठल मंदिरांना नक्की भेट द्या



Comments are closed.