अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नक
विनायक राऊत: शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. त्यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक छळ आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आता ठाणे न्यायालयातून एक अत्यंत महत्त्वाची आणि कायदेशीर अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अद्याप न्यायालयात अंतिम सुनावणी झालेली नाही. मात्र, या मुख्य अर्जावर सुनावणी होईपर्यंत पोलिसांनी आपल्याला अटक करू नये, अशी मागणी करणारा राऊत पिता-पुत्राचा ‘अंतरिम अर्ज’ न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्या मुख्य जामीन अर्जावर अद्याप निर्णय होणे बाकी असले, तरी कोर्टाने अंतरिम दिलासा नाकारल्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. कापूरबावडी पोलीस त्यांना चौकशीसाठी कधीही ताब्यात घेऊ शकतात.
Vinayak Raut: वकिलांनी दिली माहिती
या प्रकरणातील फिर्यादी गिरीजा राऊत (Girija Raut) यांना आज न्यायालयाच्या या आदेशाची प्रत मिळाली आहे. गिरीजा राऊत यांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सागर कदम यांनी या कायदेशीर बाबीवर अधिक प्रकाश टाकला. ॲड. सागर कदम यांनी स्पष्ट केले की, या केसमध्ये दोन कलम अजामीन पात्र असल्याने ठोस पुरावे आढळल्यास पोलीस कधीही अटकेची कारवाई करू शकतात असे सागर कदम म्हणाले.
Vinayak Raut: गिरीजा राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे न्यायाची मागणी
न्यायालयाने आरोपींचा अर्ज फेटाळल्यानंतर फिर्यादी गिरीजा राऊत यांनी समाधान व्यक्त केले आहे. या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, “पोलीस प्रशासनाने या प्रकरणात लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.” गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत राऊत कुटुंबीयांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचेही गिरजा राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.
Vinayak Raut Girija Raut: मूळ प्रकरण काय आहे? दोन भोंदू बाबा आधीच गजाआड
विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत आणि इतर कुटुंबीयांच्या विरोधात त्यांची सून गिरजा राऊत हिने ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सासरच्या मंडळींकडून तिचा कौटुंबिक छळ केला जात होता. तसेच या छळात काही भोंदू बाबांचा वापर करून जादूटोणा केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा आणि कौटुंबिक छळाच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत आतापर्यंत दोन भोंदू बाबांना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर विनायक राऊत आणि इतर संशयितांविरोधात पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या प्रकरणातील अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 23 जुलै रोजी पार पडणार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.