आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या राजकारणावर आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत (NCP Politics) सध्या ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) आणि आमची भेट देखील झालेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले. तसेच पक्षात कधी अविश्वास आहे, असं कधी ऐकलं नाही, असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.
अजितदादा (Ajit Pawar) असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या (NCP Merge) चर्चांना पूर्णविराम लागला, असंही सुनील तटकरेंनी सांगितले. तसेच मी खासदार आहे. मुख्यमंत्र्यांची प्रत्येकवेळी होणारी भेट राजकीय असते, असं नाही. मतदारसंघातील कामे देखील असतात. ज्यावेळी राजकीय बैठका असतात, त्यावेळी सुनेत्रा पवार यांना त्याबाबत माहिती असते. मी 40 वर्षे राजकारणात आहे. मला राजशिष्टाचार माहिती आहे, असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीबाबत सुनेत्रा पवार यांना अंधारे ठेवल्याची चर्चा रंगली होती. मात्र सुनेत्रा पवार आणि आमच्यात चांगलं टूनिंग आहे. सुनेत्रा पवारांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो, असंही सुनील तटकरे म्हणाले. (Sunil Tatkare On Sunetra Pawar)
डिलिमिटेशन बिलाला समर्थन करणं, म्हणजे एनडीएसोबत आलं असा अर्थ होतं नाही- सुनील तटकरे (Sunil Tatkare On Delimitation Bill, 2026)
गेल्या अधिवेशनात डिलिमिटेशन आलं, त्यावेळी मी मतदान केलं आहे. त्यांच्या (शरद पवारांची राष्ट्रवादी) पक्षाने पाठिंबा द्यावा, न द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. सुप्रिया सुळे यांचं म्हणणं देखील मी ऐकलं आहे. डिलिमिटेशन बिलाला समर्थन करणं, म्हणजे एनडीएसोबत आलं असा अर्थ होतं नाही, असंही सुनील तटकरे म्हणाले. दरम्यान, रविवारी मी, पार्थ पवार, प्रफुल पटेल दिल्लीत असणार आहेत. यावेळी सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटीसबाबत उत्तर द्यायचं की नाही, याबाबत निर्णय घेणार आहोत, असं सुनील तटकरेंनी सांगितलं.
सुनील तटकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद, VIDEO:
संबंधित बातमी:
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.