मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नि

एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Online Exam) संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यार्थी संघटनांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर मुख्यमंत्री यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री (Devendra Fadnavisम्हणाले की, भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत होणे आवश्यक आहे. मात्र, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना विद्यार्थी आणि यंत्रणांना पुरेसा वेळ मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यामुळे संगणकआधारित (CBT) परीक्षा पद्धती तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तोपर्यंत MPSC च्या परीक्षा सध्याच्या प्रचलित पद्धतीनेच घेतल्या जाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यानया संदर्भातील अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार असून, बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आयोगाच्या विविध सुधारणा उपक्रमांचेही कौतुक केले.

Devendra Fadnavis : संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने लागू करा

एमपीएससीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्या, अशी मागणी MPSC ची तयारी करणारे विद्यार्थीni केली होती. परिणामी आंदोलनाचा देखील इशारा दिला होईल. अशातच विद्यार्थी शिष्टमंडळाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने हि भेट घेण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यांनतर एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा, असे सूचना प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Abhimanyu Pawar : 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इच्छा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो

तर या विषयी बोलताना आमदार अभिमन्यू पवार म्हणाले तेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थी संघटनांची भावना लक्षात घेतली. 90 टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची इच्छा होती की परीक्षा ऑफलाईन घेतली पाहिजे. विद्यार्थी यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, त्यांनी आता अभ्यास कराकिंवा. मुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक झाली, त्यात त्यांनी स्पष्ट केलं की ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी यंत्रणा उभी करू. टप्प्याटप्प्याने परीक्षा आपल्याला देखील ऑनलाईन घ्याव्या लागतील, असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

Comments are closed.