अचिन अहिरांना ‘रायगड’ बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण सध्या राहतात
मुंबई : ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर विधानपरिषद आमदार सचिन अहिर यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. थेट विधानपरिषद सभापतीपदी (mumbai) त्यांना संधी देण्यात आल्याने ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो. त्यातच, उपसभापतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या वरळी मतदारसंघात सचिन अहिर यांनी सभा घेऊन आपली भूमिका मांडली असून ते पदावर कार्यरत झाले आहेत. मात्र, सध्या सचिन अहिर यांना बंगला नाकारण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. विशेष म्हणजे, शासकीय बंगल्याऐवजी त्यांना फ्लट मंजूर करण्यात आला असून त्यांनी अद्याप फ्लॅट स्वीकारला नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली. आम्ही यांना सर्वकाही दिलं, ते तर माझ्यासोबतच कायम असायचे, आता आणखी काय द्यायचं बाकी होतं असेही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर, वरळीतील सभेतून सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. आता, सचिन अहिर आपल्या शासकीय निवासस्थानामुळे चर्चेच आहेत. कारण, उपसभापती सचिन अहिर यांना मंजूर केलेला शासकीय बंगला नाकारण्यात आला आहे. उपसभापतींसाठी ‘रायगड’ हा बंगला मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता त्या बंगल्याऐवजी त्यांना फ्लॅटमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे.
शासकीय निवासस्थान असलेला ‘रायगड’ हा बंगला माजी मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सध्या वापर करत आहेत. विशेष म्हणजे रविंद्र चव्हाण सध्या मंत्री नसून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महायुती सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाममंत्री होते, तेव्हा ‘रायगड’ हा बंगला त्यांना वाटप करण्यात आला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 2024 च्या कॅबीनेटमध्ये ते मंत्री नाहीत. तरीही, त्यांच्याकडे रायगड बंगला गेल्या दीड वर्षांपासून आहे. आता, उपसभापतींसाठी देण्यात येणारा हा बंगला आात नाकारण्यात आला
एकनाथ शिंदेंच्या कानावर विषय टाकणार
उपसभापतीपदी विराजमान झाल्यानंतर सचिन अहिर यांना पुरंदर(C-3) हा बंगला मंजूर करण्यात अशी सुरूवातीला चर्चा होती. उपसभापती नीलम गोऱ्हे यांना यापूर्वी हा बंगला मंजूर करण्यात आला होता. मात्र, अहिर शपथ घेण्या अगोदरच हा बंगला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना वाटप करण्यात आला. त्यामुळे, आता सभापतींसाठी कुठलाही बंगला उरला नसल्याने राज्य सामान्य प्रशासन विभागाने सचिन अहिर यांना फ्लॅट मंजूर केला आहे. मात्र, सचिन अहिर अद्याप फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले नसून बंगला आणि फ्लॅटचा विषय ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.